22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeऔरंगाबादवैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी साधला थेट शेतकऱ्यांशी संवाद

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी साधला थेट शेतकऱ्यांशी संवाद

मुरमा, पिंपळगावात पिकांच्या नुकसानीची पाहणी

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद, दिनांक 20 : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पैठण तालुक्यातील मुरमा आणि औरंगाबाद तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट शेतकर्‍यांशी संवाद साधला. तसेच शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देत शासन नियमानुसार नुकसान भरपाई देणार असल्याची ग्वाही श्री. देशमुख यांनी दिली.

मुरमा येथे एकनाथ मानमोडे, सोनाजी लेंभे यांच्या शेतात जाऊन कापसाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी श्री.देशमुख यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पीक नुकसानीसह धान्य वितरण, अनुदान आदींबाबत समस्या मांडल्या. त्या समस्या तत्काळ सोडवू, काळजी करू नका, अशी ग्वाही श्री.देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिली. तसेच औरंगाबाद तालुक्यातील पिंपळगाव येथे संतोष मोरे यांच्या द्राक्ष बागेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासन योग्य ती नियमानुसार मदत करणार असल्याचे श्री.देशमुख यावेळी म्हणाले.

अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी पीक नुकसानीबाबत, प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत मंत्री श्री.देशमुख यांना सविस्तर माहिती दिली.

या पाहणी दरम्यान श्री.देशमुख यांच्या समवेत कल्याण काळे, अनिल पटेल, मुरुमाचे सरपंच एकनाथ फटांगडे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, किशोर देशमुख आदींसह महसूल, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचीही उपस्थिती होती.

प्रथमच देशात करण्यात आली हिंगाची लागवड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या