34.3 C
Latur
Tuesday, April 13, 2021
Homeमराठवाडाजालन्यात गुराख्याची गळा चिरून हत्या

जालन्यात गुराख्याची गळा चिरून हत्या

एकमत ऑनलाईन

जालना : जिल्ह्यातील घनसावंगी येथील सूतगिरणीजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या गुराख्याची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मारोती विश्वनाथ जाधव असे हत्या झालेल्या गुराख्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

घनसावंगी येथील सूतगिरणीजवळ पत्र्याच्या शेडमध्ये मारोती विश्वनाथ जाधव (४०) हे कुटुंबासह राहतात. शेळ्या सांभाळून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घराशेजारीच शेळ्यांसाठी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये रात्री मारोती जाधव झोपले होते. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास शेळ्यांचा आवाज आल्यामुळे त्यांच्या पत्नीला जाग आली. त्यांनी पतीला आवाज दिला असता, मारोती यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही.

त्यामुळे त्या बाहेर आल्या असता, मारोती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकाने काही अंतरापर्यंत माग काढला. त्यामुळे ही हत्या कोणी आणि का केली, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

हिमाचलमध्ये विनामास्क थेट तुरुंगवास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या