30.6 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home औरंगाबाद औरंगाबादेत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

औरंगाबादेत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास आघाडीमुळे फायदा झाला आणि मताधिक्य वाढलं अस मत विजयी उमेदवार सतीश चव्हाण व्यक्त केलं. पहिल्या फेरी पासून सतीश चव्हाण यांनी घेतलेली आघाडी पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिली. सतीश चव्हाण यांना एकूण 116638 मते मिळाली. तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना 58743 मते मिळाली.

सतीश चव्हाण यांना 1 लाख 18 हजार 638 मते मिळाली तर शिरीष बोराळकर यांना 58 हजार 743 मते मिळाली. एकूण वैध मते 2 लाख 18 हजार 816 तर 23092 मते बाद ठरली. सतीश चव्हाण यांनी विजय मिळवताच आघाडी घेताच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केलं. मतमोजणीच्या आणखी दोन फेऱ्या शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरू होत्या.

सुरुवातीपासून सतीश चव्हाणांची आघाडी
सन 2014 च्या तुलनेत यंदा दुप्पट मतदान झाल्याने औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत भाजप व आघाडीत चुरशीची लढत होण्याची चिन्हे होती. मात्र सतीच चव्हाणांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतल्याने भाजपच्या विजयाच्या आशा मावळल्या होत्या. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी रात्री 2 वाजता जाहीर झालेल्या तिसऱ्या फेरीत भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यावर 41 हजार 198 मतांची निर्णायक आघाडी घेतली होती. त्यामुळे आमदारकीची हॅट‌्ट्रिक साधण्याचा त्यांचा मार्ग आधीच मोकळा झाला होता. तिसऱ्या फेरीअखेर चव्हाणांना एकूण 81216 मते, बोराळकरांना 40018 मते मिळाली. सतीश चव्हाण यांना 1 लाख 18 हजार 638 मते मिळाली तर शिरीष बोराळकर यांना 58 हजार 743 मते मिळाली. एकूण वैध मते 2 लाख 18 हजार 816 तर 23092 मते बाद ठरली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या