34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeमराठवाडालस घेऊनही अधिकारी पॉझिटिव्ह - बीडमध्ये खळबळ

लस घेऊनही अधिकारी पॉझिटिव्ह – बीडमध्ये खळबळ

एकमत ऑनलाईन

बीड : सध्या देशभरात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू आहे. याअंतर्गत सध्या कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू करण्यात आला आहे. दरम्यान कोरोना लसीबाबत काहींच्या मनात अद्यापही संभ्रम आहे. त्यातच अशी बातमी समोर येत आहे की, कोरोनाची लस घेऊनही बीड जिल्हा आरोग्य अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी कोरोना लस घेतल्यानंतर कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. १८ व्या दिवशी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बीडमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कोरोनाला वेशीवर रोखण्यात ग्रामीण आरोग्य यंत्रणेची भूमिका महत्त्वाची होती. चेक पोस्ट तपासणी, कोरोनाच्या हॉटस्पॉट असणाºया भागात जाऊन पाहणी करणे इत्यादी कामांमध्ये डॉ. पवारांचा पुढाकार होता. महिन्यापूर्वीच त्यांची एक कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. पण थोडा त्रास जाणवल्याने त्यांनी अँटीजेन टेस्ट केली. यात पवार यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

त्या’ दुर्देवी अपहर्र्त मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला, शोककळा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या