25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeमराठवाडामराठवाड्यात फक्त १,६९५ नवे रुग्ण; ७१ मृत्यू तर ३,९५७ कोरोनामुक्त

मराठवाड्यात फक्त १,६९५ नवे रुग्ण; ७१ मृत्यू तर ३,९५७ कोरोनामुक्त

एकमत ऑनलाईन

लातूर/नांदेड : मराठवाड्यातील ६ जिल्ह्यात मिळून रविवारी १,६९५ नवे रुग्ण आढळले. शनिवारपेक्षा त्यात तब्बल ५५६ ने घट झाली. ३,९५७ रुग्ण कोरोनामुक्त तर ७१ रुग्णांचा मृत्यू झाला. मराठवाड्यात कोरोनाचा संसर्ग निश्चितपणे कायमचा उतरणीलाच लागल्याचे ठामपणे म्हणता येत आहे. महिनाभरापुर्वी केवळ नांदेड जिल्ह्यांतच रोज २,५०० नवे रुग्ण सापडत होते. मात्र रविवारी ६ जिल्ह्यांत मिळूनही जवळपास दीड हजार नवे रुग्ण सापडल्याने मराठवाडाकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. रुग्णसंख्येत होत असलेली घट ही बहुतांशपणे आरोग्य यंत्रणेचे यश आहे, असे म्हणता येईल. सर्व नागरिकांनीही निष्काळजीपणाला थारा न देता कोरोना प्रतिबंधक नियमांचे कडेकोट पालन केले पाहिजे. लातूर जिल्ह्यात ३९५ नवे रुग्ण तर ३७ रुग्ण दगावले. परभणी जिल्ह्यात २५३ नवे रुग्ण आढळले. जिल्हाभरात ७८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. १४ रुग्णांचा मृत्यू झाला. नवे रुग्ण कमी व कोरोनामुक्त अधिक असल्याने कोरोना संसर्ग चांगलाच घटला. मृत्यूचे प्रमाणही शनिवारपेक्षा कमीच होते.

उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारपेक्षा मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. शनिवारपेक्षा ११४ कमी म्हणजे ४९२ नवे रुग्ण आढळले. तसेच ६८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ९ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूचे प्रमाणही घटले. जालना जिल्ह्यात रविवारी आणखी परिस्थिती सुधारली. शनिवारपेक्षा ३० कमी म्हणजे २७६ नवे रुग्ण आढळले. तसेच ६८० रुग्ण कोरोनामुक्त झाले. ६ रुग्णांचा मृत्यू झाला. शनिवारपेक्षा कमी नवे रुग्ण व कमी मृत्यू झाल्याने कोरोना संसर्गात काहीशी घट झाली.
नांदेड जिल्ह्यात बुधवारपेक्षा ८४ कमी म्हणजे २०८ नवे रुग्ण आढळले, तर १५० कमी म्हणजे ५२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. गेल्या २ दिवसांत मिळून १३ जणांचा मृत्यू झाला. नव्या रुग्णांच्या संख्येत घट व कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतहि किंचित घट झाली.मृत्युसंख्येतील फरक जवळपास स्थिर होता. जिल्ह्याच्या कोरोना संसर्गात ब-यापैकी घट दिसून आली.

हिंगोलीतील संसर्ग दोन आकड्यात
हिंगोली जिल्ह्यात ७१ नवे रुग्ण आढळले. १४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. हिंगोलीतही शनिवारपेक्षा कमी नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यात ५ रुग्णांचा मृत्यू झाला. नवीन रुग्णांची संख्या कमी, कोरोनामुक्तांची संख्या जास्त यामुळे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या चांगलीच घटली.

परभणी, लातुरात तिप्पट कोरोनामुक्त
रविवारी सर्वच जिल्ह्यांतील कोरोनाचा आलेख घसरला. त्यातही विशेष बाब म्हणजे हिंगोली, नांदेड व जालना या जिल्ह्यांत नव्या बाधितांपेक्षा कोरोनामुक्त दुपटीपेक्षा अधिक होते. लातूर व परभणी जिल्ह्यांत तर नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जवळपास तिप्पट जास्त होते. उस्मानाबाद जिल्ह्यांत तेवढे हे प्रमाण दुपटीपेक्षा काही प्रमाणात कमी होते.

तौत्के चक्रीवादळाचा फटका; विजेचा लपंडाव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या