31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeमराठवाडाधावत्या एसटी बसमध्येच प्रवाशाने केले विष प्राशन

धावत्या एसटी बसमध्येच प्रवाशाने केले विष प्राशन

एकमत ऑनलाईन

जालना : गेवराई येथून एसटी बस मधून प्रवास करीत असताना एका अनोळखी इसमाने बसमध्येच विष प्राशन केल्याचा केल्याचा खळबळजनक घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात या प्रवाश्याची प्राणज्योत मालवली असून त्याची ओळख मात्र अद्याप पटू शकलेली नाही.

अंदाजे ५० वर्ष वयाचा एक अनोळखी इसम गेवराईहून अंबड जाण्यासाठी एसटी बसमध्ये बसला. बस अंबड जवळ पोचत असताना बसमध्ये दुर्गंधी येत असल्याची व एक प्रवाशी गंभीर असल्याचे प्रवाश्यांनी चालक आणि वाहकांच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा त्या प्रवाशाने विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला असल्याचं समजताच बसमध्ये एकच खळबळ उडाली.

चालक आणि वाहकाने प्रवाश्यांच्या मदतीने सदर इसमास अंबड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या ठिकाणी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय येथे दाखल केले असता त्याची प्राणज्योत मालवली. दरम्यान, सदर इसमाची ओळख अद्याप पटू शकली नसून पोलीस त्यांचा तपास करत आहेत.

मॅन्युफॅक्­चरिंग क्षेत्रात मोठी वाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या