20.8 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमराठवाडाविकासास प्राधान्य, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी घोषणांचा पाऊस

विकासास प्राधान्य, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी घोषणांचा पाऊस

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे ध्वजवंदन केले. यावेळी त्यांनी मराठवाड्यासाठी विविध घोषणा करताना संतपीठ स्थापन करणे, १५० निजामकालीन शाळांचा पुनर्विकास, २०० मेगावॉल्टचा सौर ऊर्जा प्रकल्प, रस्त्यांसह घृष्णेश्वर, औंढा नागनाथ मंदिर विकास, पाणीपुरवठा योजना, गटार योजना, रेल्वे सेवा यासंबंधीच्या कामांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले. तसेच मराठवाड्याच्या विकासासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी आज पुष्पचक्र अर्पण करून मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्मांना अभिवादन केले. यावेळी भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी अनेक योजनांचा पाढा वाचून दाखवत एमआयएमला प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री यादी घेऊन आले एवढी कामे जाहीर केली. पुढे काय होणार, असे काही जण बोलत असतील. त्यांना मला सांगायचे आहे की, आमचा विकास आता सुरू झाला आहे आणि अजून खूप होणार आहे, असे म्हटले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने हे संतपीठ सुरू केले जाणार आहे. हे संतपीठ मोठे व्हावे आणि यातून महाराष्ट्राच्या संत परंपरेतील संतांची शिकवण दिली जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच निजामकालीन १५० शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. मराठवाड्यातील शाळांचे रुप अभिमान वाटला पाहिजे, असे करणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शिर्डी-औरंगाबाद विमानसेवेचा मानस
परभणी वैद्यकीय महाविद्यालय आपण सुरू करतोय. संभाजीनगर आणि मराठवाडा एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे शिर्डी आणि औरंगाबाद विमानसेवा सुरू करण्याचा मानस यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. तसेच घृष्णेश्वर मंदिराच्या सभामंडपाचे वेगळ््या प्रकारे बांधकाम करत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे परभणीत केले स्वागत
औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्तिदिनानिमित्तझालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली. त्यानंतर परभणीकरांनी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार सुरेश देशमुख, आमदार राहूल पाटील आदी उपस्थित होते.

घोषणांचा पाऊस
औरंगाबाद -अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना
औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक उभारणार
औरंगाबाद-शिर्डी विमानसेवेचा मानस
घृष्णेश्वर मंदिराचा सभामंडप मोठा करणार
मराठवाड्यात २०० मेगा वॉल्टचा सौरऊर्र्जा प्रकल्प उभारणार
निजामकालीन दीडशे शाळांचा पुर्नविकास करणार
सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी ३८२ कोटी रुपये
मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी नगरोत्थानमधून ३१७.२२ कोटींचा निधी देणार
औरंगाबाद शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रिया वेगाने करावी
औरंगाबाद सफारी पार्क जगातील वैशिष्ट्यपूर्ण करणार
परभणीत भूयारी गटार योजनेसाठी ३५० कोटी
परभणीत जलजीवन अभियानातून पाणी पुरवठ्यासाठी १०५ कोटी
उस्मानाबाद शहरासाठी १६८.६१ कोटी रकमेची भूमीगत गटार योजना राबविणार
-हिंगोलीत दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी ६ कोटी
हिंगोलीत हळद प्रक्रिया उद्योगासाठी ४.५० कोटी
औंढा नागनाथ मंदिर परिसर विकासासाठी ८६.१९ कोटी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या