25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeमराठवाडामराठवाड्यात ३ दिवस वादळी वा-यासह पाऊस

मराठवाड्यात ३ दिवस वादळी वा-यासह पाऊस

एकमत ऑनलाईन

परभणी : राज्यांत गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अशातच मराठवाड्यात पुन्हा ३ दिवस वादळी वा-यासह पावसाचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ग्रामीण कृषि हवामान विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. कैलास डाखोरे यांनी व्यक्त केला आहे. पुढील तीन दिवस उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यात वादळी वा-यासह पावसाची शक्यता आहे.

कृषि विद्यापीठाने ७ मे पर्यंत लातूर, उस्मानाबाद नांदेड, बीड जिल्ह्यात वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. अंदाजानुसार दि. ४ मे रोजी उस्मानाबाद, लातूर व नांदेड या तीन जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट व पावसाची शक्यता आहे. दि. ६ मे रोजी पुन्हा याच ३ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दि. ७ मे रोजी बीड, उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दोन दिवस मोठे नुकसान
परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात ८ मेपर्यंत वादळीवा-यासह पावसाचा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आला होता. त्यानुसार गेल्या २ दिवसांत मराठवाड्यातील परभणी, नांदेड, औरंगाबाद, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात अवकाळीने हजेरी लावली. हळदीसह बागायती पिकांचे नुकसान केले. तसेच विजांच्या तडाख्याने माणसांसह जनावरांचाही मृत्यू झाला.

काय काळजी घ्यावी ?
आगामी ४ दिवसात शेतकरी व सर्व सामान्य नागरीकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. झाडाच्या आडोशाला उभे राहू नये. पशुधनास निवा-याच्या जागी बांधावे, झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू किंवा मोकळे सोडू नये असे आवाहन डॉ. कैलास डाखोरे यांनी केले आहे.

कोरोना अनुदानापासून लाखो कामगार वंचित राहणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या