25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home बीड बीडमध्ये बलात्कार पीडितेला केले गावातून हद्दपार

बीडमध्ये बलात्कार पीडितेला केले गावातून हद्दपार

एकमत ऑनलाईन

बीड : बीडमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाचेगावमध्ये अजब प्रकार घडला आहे. बलात्कार पीडितेला गावातून हद्दपार करण्याचा ग्रामसभेत चक्क ठराव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ठरावावर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिका-यांनी शिक्कामोर्तबही केले आहे.

यापेक्षाही लाज आणणारी बाब म्हणजे, गावक-यांनी थेट पोलिस अधीक्षकांकडेही या महिलेला गावबंदी करावी यासाठी निवेदन दिले आहे. या संतापजनक प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात काय चालले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

५ वर्षांपूर्वी या महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा देण्यात आली. मात्र त्यानंतर या पीडित महिलेच्या मुलीवरही अत्याचार करण्यात आला. आणि हे प्रकरण दाबण्यासाठीच आपल्यावर गाव सोडण्यासाठी दबाव येत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

थर्टी फर्स्ट साठी पुण्यात तब्बल ५ हजार पोलिस तैनात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या