26.9 C
Latur
Sunday, January 24, 2021
Home मराठवाडा माजलगावमधील तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

माजलगावमधील तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

मुंबईहून आलेल्या तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली : संपर्कातील 36 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येणार

बीड : लॉकडाऊन सुरू होऊन 2 महिने होत आहेत. या काळात बीड जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, माजलगाव तालुक्यातील हिवरा येथे मुंबईहून आलेल्या तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रविवारी प्रशासनाने गावची आणि परिसरातील 10 गावांची कडेकोट नाकाबंदी केली. त्यामुळे या गावांमध्ये शांतता आहे. या तरुणाच्या कुटुंबातील आणि संपर्कातील 36 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल परदेशी यांनी दिली.

Read More  ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीचे माकडांवर सकारात्मक परिणाम; आता मानवांवर चाचणी

बीड जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळला नसल्याने समाधान व्यक्त होत असतानाच शनिवारी अचानक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण आहे. मुंबई येथे कामाला असलेला हा तरुण 12 दिवसांपूर्वी कोणत्याही आरोग्य तपासणीशिवाय जालना जिल्ह्यातून गोदावरी नदी ओलांडून हिवरा गावात आला. त्यास जालना जिल्ह्यातून आणण्यासाठी त्याच्या कुटुंबातील एक जण मोटरसायकल घेऊन गेला होता, अशी माहिती मिळाली आहे. या तरुणाची टाकरवण आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली होती. त्याच्या अहवालानंतर प्रशासन हादरले.

या 12 दिवसांत तो कोणाकोणाच्या संपर्कात आला होता, त्याने राजेगाव येथे एका डॉक्टरकडेही तपासणी केली होती. तेथेही अनेक लोकांच्या तो संपर्कात आला होता अशी माहितीही मिळाली आहे. दरम्यान गावात आरोग्य खात्याचे अधिकारी व कर्मचारी तळ ठोकून असून घराघरात तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून हिवरा गावच्या परिसरात कंटेनमेंट(3 किमी) व बफर झोन (7 किमी) मधील गावांची नाकाबंदी केली आहे. हिवरा बुद्रूक, गव्हाणथडी, काळेगावथडी, डुब्बाथडी, भगवाननगर ही गावे कंटेन्मेट झोनमध्ये तर राजेगाव, सुर्डी, महातपूरी, वाघोरा, वाघोरातांडा ही गावे बफर झोन असून या 10 गावात नाकाबंदी करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,416FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या