30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeमराठवाडापिककर्ज वाटपासाठी बीडमध्ये शिवसेनेची बँकेत धडक

पिककर्ज वाटपासाठी बीडमध्ये शिवसेनेची बँकेत धडक

एकमत ऑनलाईन

बीड : खरीप हंगाम निघून जात आहे. पेरणीचे दिवस असताना शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवत आहे. मात्र, पिककर्ज शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही, अशा परिस्थितीत शेतकरी बँकांच्या अटींमध्ये गुरफटला आहे. बँका कर्ज वाटपात टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर शिवसेनेने शहरातील तीन बँकांमध्ये धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी प्रशासनाला धारेवर धरून पिककर्ज वाटपासाठी अल्टीमेटम दिला आहे.

सध्या खरीप हंगामाच्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. पिककर्जासाठी शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवत आहे. विविध बँका शेतकऱ्यांना पिककर्ज वाटपामध्ये टाळाटाळ करत आहेत. हा गंभीर प्रकार शिवसैनिकांच्या समोर आल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बुधवारी बीड शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामिण बँक आणि युनियन बँकेत जाऊन बँकेचे स्टींग ऑपरेशन केले. त्यांचा भोंगळ कारभार उघडकीस आणला. पिककर्जासाठी 950 कोटी रूपयाचे उद्दिष्टय असताना शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ 88 कोटी रूपयांचे पिककर्ज वाटप करण्यात आले.

पिककर्ज वाटपात शेतकऱ्यांची अडवणूक सुरू आहे. शेतकऱ्यांची अडवणूक आणि छळवणूक शिवसेना कदापी सहन करणार नाही. एसबीआय बँक, महाराष्ट्र ग्रामिण बँक आणि युनियन बँक यांच्या स्टींग ऑपरेशनमुळे शहरातील सर्वच बँकांमध्ये खळबळ उडाली. आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे पिककर्ज वाटप करण्याचे अल्टीमेटम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख खांडे यांनी दिले आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, जयसिंग चुंगडे, उपजिल्हाप्रमुख बंडू पिंगळे, तालुकाप्रमुख गोरख सिंघन, शिवसेना जिल्हासचिव वैजीनाथ तांदळे, शिवसेना शहरप्रमुख सुनिल सुरवसे आदींसह शिवंसैनिक उपस्थित होते.

काय आहे नेमका प्रकार

बीड जिल्ह्यामध्ये एसबीआय बँकांच्या 47 शाखा असून कोणत्या शाखेने पिककर्ज वाटपाची उद्दिष्टय पूर्ण केली असा सवाल जिल्हाप्रमुख खांडे यांनी उपस्थित केल्यानंतर या प्रश्नाचे उत्तर बँक प्रशासनाला देता आले नाही. गेवराईमध्ये तर प्रत्येक शेतकऱ्याकडून एक लाख रूपयाच्या पिककर्जासाठी पाच हजार रूपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. बँक प्रशासनाची मनमानी तेथील अधिकाऱ्यांची मग्रुरी, शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक या गंभीर बाबी खांडे यांनी मांडल्या. शेतकऱ्यांची पिळवणूक न करता तातडीने पिककर्ज द्या, अन्यथा शिवसेना स्टाईल धडा शिकवू असा इशारा खांडे यांनी दिला.

पिककर्जासाठी गेल्या आठ दिवसापासून हेलपाटे मारणारे शेकडो शेतकरी बँकेच्या दारात बसून होते. नेहमीचे उत्तर आजही मिळत होते. कोरोनाचे संकट असताना शेतकऱ्यांना बँकेसमोर ठाण मांडून बसावे लागत होते. आज दुपारी बँकाना जाब विचारण्यासाठी शिवसैनिकांचा ताफा बँकेमध्ये येताच शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला. बँक अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना शिवसैनिकांनी धारेवर धरले. तसेच पिककर्जासाछी अल्टिमेटम दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Read More  मन मंदिरा गजर भक्तीचा; अवघी पंढरी सुनी सुनी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या