चिंता आणखी वाढली : काळजी घ्या, घरात सुरक्षीत रहा
बीड : गेले पन्नास दिवस कोरोना शून्य असलेल्या बीड जिल्ह्याची चिंता मात्र आता दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातून सोमवारी 66 जणांचे स्वब पाठविण्यात आले होते. त्यापैकी मंगळवारी रात्री उशिरा तब्बल 8 पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 12 + 8 अशी 20 संख्या झाली असून त्यापैकी एक मयत असून एक जण कोरोना मुक्त झालेला आहे. तर 6 जण पुण्याला रवाना झाले आहेत.
Read More बीडमध्ये आणखी 2 जण कोरोना पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात आणखी 8 पॉझिटिव्ह
१ ) इटकूर येथील कोरोनाग्रस्त मुलीची आई – वय 35 2) चंदनसावरगाव ता केज – वय 23 मुंबईहून येथून शहरात दाखल झाले 3) केळगाव ता केज – वय 29 मुंबईहून येथून शहरात दाखल झाले. 4) ठाणे येथून आलेले दोघे – वय 22 व 44 (मोमीनपुरा, बीड) 5) ठाणे येथून आलेले – वय 16, 14 व 36 (रा सावतामाळी चौक, बीड)