मृत्युचे नेमके कारण अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार
बीड :दोनवेळा तपासणीसाठी पाठवलेल्या थ्रोटच्या स्वॅबचा अहवाल अनिर्णयीत आलेल्या एका तरुणाचा बीडच्या जिल्हा रूग्णालयातील कोरोना कक्षात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या तरूणाचा स्वॅब सोमवारी सकाळी तिसऱ्यांदा तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आता त्याचा अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले.
बीडच्या जिल्हा रूग्णालयात कोरोना कक्षामध्ये सोमवारी मृत्यू झालेला 32 वर्षीय तरूण व त्याचे कुटुंब 31 मे रोजी मुंबईहून मातकोळी (ता.आष्टी) येथे परत आले होते. एका कोरोनाबाधित रूग्णासोबत या कुटुंबाचा संपर्क आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या दाम्पत्यासह त्यांच्या दोन मुलांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. त्यामध्ये तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.
Read More ग्लोबल टाईम्सने निशाणा साधला : भारतीय चीनी वस्तूंवर बहिष्कार घालूच शकत नाही
तर तरुणाचा अहवाल अनिर्णत आला होता. पुन्हा 48 तासांनी त्या तरुणाचे स्वॅब पाऑवण्यात आले, तो रिपोर्टही अनिर्णयीत आला. अखेर रविवारी रात्री पुन्हा त्या तरुणाचा स्वॅब घेतला. तपासणीसाठी सोमवारी सकाळी पाठवूनही देण्यात आला. त्यानंतर काही वेळातच त्या तरूणाचा मृत्यू झाला. मृत्युचे नेमके कारण अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.