बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकून 36 कोरोनाबाधित रुग्ण
बीड, 22 मे: बीड जिल्हा रुग्णालयात कोरोना टेस्टसाठी स्वॅब घेतलेल्या व्यक्तीचा आयसोलेशन वार्डमध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वॅब घेतल्यानंतर अवघ्या तासभरात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडाही झपाट्यानं वाढत आहे.
Read More थोड्याच वेळात होणार मोठी घोषणा, आरबीआय गव्हर्नर घेणार पत्रकार परिषद
जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात एकाला दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी स्वॅब घेतल्यानंतर अवघ्या एक तासाच या व्यक्तीचा मृत्यू झाला. आता अहवालाची प्रतीक्षा आहे. मृत रुग्ण आष्टी तालुक्यातील रहिवासी आहे. तो गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याने विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते. मात्र, श्वसनाचा त्रास वाढल्यानंतर त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री त्याचा कोरोना टेस्टसाठी स्वॅब घेतला. त्यानंतर तासभरात या रुग्णाचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकून 36 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. एका वृद्ध महिलेचा मृत्यू तर सहा रुग्णांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलं आहे.