25.2 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमराठवाडाजालन्यात कोरोना रुग्णांची धक्कादायक वाढ

जालन्यात कोरोना रुग्णांची धक्कादायक वाढ

एकमत ऑनलाईन

जालना :  जिल्ह्यात कोरोना व्हायरसने मोठं थैमान घातलं आहे. आज सकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात 53 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये आज दुपारी आणखी 48 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ही आता 1 हजार 549 इतकी झाली आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आढळून आलेल्या 48 रुग्णांपैकी एक रुग्ण भोकरदन तालुक्यातील बोरखेडी येथील वगळता उर्वरित 47 रुग्ण हे जालना शहरातील आहे. यामध्ये पुष्पक नगर मधील सर्वाधिक 5 जणांचा समावेश असून त्यानंतर व्यंकटेश नगर 4, मस्तगड , रंगार खिडकी मंगलबाजार या भागातील प्रत्येकी 3, लक्कडकोट, मंगलबाजार या भागातील प्रत्येकी 2 तसेच विठ्ठल मंदिर कसबा, शाकुंतल नगर, कसबा, राममंदिर, पिवळा बंगला, नया बाजार, महालक्ष्मी नगर, भाग्यनगर, सिध्दी विनायक नगर, दर्गावेस, कॉलेज रोड, तेरापंथी गल्ली मंगळबाजार, कालिकुर्ती, मलाव गल्ली मस्तगड, ख्रिस्ती केम्प, रामनगर जालना, गांधीनगर, तेरापंथी भवन, पोलासगल्ली, रुख्मिनी नगर,नाथबाबा गल्ली, जवाहर बाग, गोपाल नगर,शिवाजी पुतळा, अग्रेसन नगर,सुखशांती नगर या भागातील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

जालन्याची एकूण रुग्णसंख्या आता 1 हजार 549 झाली असून काल सोमवारपर्यंत 894 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात 562 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Read More  श्रीराममंदीर भूमिपूजन : राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांना तंबी !

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या