29.9 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home उस्मानाबाद श्री तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी खुले

श्री तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी खुले

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद: गेली आठ महिने कोरोना महामारीमुळे कुलूपबंद असलेले श्री तुळजाभवानीचे मंदिर उद्या सोमवारपासून भाविकांसाठी खुले होणार आहे. पण दररोज केवळ चार हजार भविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार असून,यामुळे दर्शनासाठी आतुर असलेल्या लाखो भाविकांचा भ्रमनिरास होणार आहे. तुळजापूरची श्री तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. तिच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक , आंध्रप्रदेश , तेलंगना राज्यासह अन्य भागातून मोठ्या संख्येने भाविक येतात. दररोज किमान ३० ते ४० हजार तसेच मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी किमान १ ते २ लाख भाविक तुळजापुरात येत असतात.

दर दोन तासाला ५०० भक्तांना मुख दर्शन दिले जाणार
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन बुकींग करावी लागणार असून दररोज ४ हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर संस्थानने केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. तुळजाभवानी मंदिराच्या वेबसाईटवर दररोज १ हजार पेड दर्शन पास तर ३ हजार मोफत दर्शन पास उपलब्ध असणार आहेत. दर २ तासाना ५०० भाविकांना दर्शन मिळणार आहे.

तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात भक्तांना प्रवेश नाही
पुजारी, महंत व मानकरी हे तुळजाभवानी देवीच्या सर्व धार्मिक विधी व पुजा सरकारने दिलेल्या कोविड नियमानुसार करतील. भक्तांना तुळजाभवानी देवीच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक, सिंहासन पुजासह व इतर पूजा करता येणार नाही. मात्र मुख दर्शन घेता येणार आहे. सामुहिक आरती करता येणार नसुन तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात भक्तांना प्रवेश नाही. मंदिर सुरू झाल्याने भाविकांनी एकत्र गर्दी न करण्याचे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.

आता आधारकार्ड होणार अधिक ‘सुरक्षित’

 

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या