26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeमराठवाडाउपद्रवी कार्यकर्त्यांचा लवकरच बंदोबस्त; पंकजा मुंडे

उपद्रवी कार्यकर्त्यांचा लवकरच बंदोबस्त; पंकजा मुंडे

एकमत ऑनलाईन

अंबाजोगाई : आपल्याविरोधात विनाकारण अफवा पसरविणा-या उपद्रवी कार्यकर्त्यांची ओळख झाली असून लवकरच त्यांचा बंदोबस्त केला जाईल, असा इशारा भाजपाच्या भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मंडे यांनी दिला आहे.

आंबाजोगाईमध्ये शनिवारी आ. नमिता मुंदडा यांच्यावतीने पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी अफवा पसरवणा-यांवर पंकजा मुंडे यांनी कडक शब्दात कोरडे ओढले. पंकजा म्हणाल्या की , असिम्प्टोमॅटिक रुग्ण ज्याप्रमाणे समाजात कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास जास्त कारणीभूत ठरतात. तसेच हे राजकारणातील असिम्प्टोमॅटिक कार्यकर्ते जास्त घातक ठरतात. सध्या अशा उपद्रवी कार्यकर्त्यांची संख्या वाढली असून त्यांची ओळख झाली आहे. लवकरच त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल,

मी खंबीर ; तुम्ही चिंता करु नका
एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरानंतर आता पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार का? का आणखी कुठे जाणार? याबाबत विविध अंदाज वर्तविण्यात येत आहेत. विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर पक्ष आणि राजकारणापासून अलिप्त झाल्यापासून पंकजा मुंडे भाजप सोडणार अशी चर्चा सुरु झाली होती. या सर्व चर्चेवर भाष्य करत त्यांनी पक्षांतराच्या अफवा पसरविणा-यांचा चांगलाच समाचार घेतला. माझ्याबद्दल अफवा का पसरविल्या जातात हेच मला समजत नाही. माझ्या पक्षाने मला भरपूर दिले आहे. तसेच गोपीनाथराव मुंडे यांची शिदोरी माझ्या पाठीशी भक्कम आहे. त्यामुळे तुम्ही माझी चिंता सोडा, अशा शब्दात त्यांनी अफवा पसरवणा-यांचा खरपूस समाचार घेतला.

केंद्र सरकारचा कर्जदारांना मोठा दिलासा; मॉरेटेरिअम काळातील चक्रवाढ व्याजाचर रक्कम मिळणार परत

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या