22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeऔरंगाबादमुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद विद्यापीठात विद्यार्थी आक्रमक
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ््याचे अनावरण झाले. यानंतर विद्यापीठाच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आध्यक्षीय भाषणाला सुरवात करताच सभागृहात उपस्थित विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली.

यावेळी विद्यार्थ्यांनी प्राध्यापक भरती करा, अशी मागणी केली. ही घोषणाबाजी पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विद्यार्थ्यांना शांततेचे आवाहन केले आणि त्यांना आश्वासनही दिले. दम धरा आम्हाला दोनच महिने झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी आम्ही एक मोठा कार्यक्रम केला आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे, असे ते म्हणाले. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार जागांची भरती काढण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी आपल्या भाषणातून विद्यापीठातील विविध विभागांची माहिती दिली. यानंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील झालेल्या संवादाचा दाखला देत मंत्री सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केल्यास ते नक्की सकारात्मक विचार करतील, असे डॉ. येवले म्हणाले. तसेच विद्यापीठात विविध विभागातील कामासाठी निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या