25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeमराठवाडामराठवाड्यात संसर्गाचा आलेख उतरता

मराठवाड्यात संसर्गाचा आलेख उतरता

एकमत ऑनलाईन

लातूर/नांदेड : परभणी, उस्मानाबाद जालना, लातूर, हिंगोली व नांदेड या ६ जिल्ह्यात मिळून रविवारी ३०४६ नवे रुग्ण आढळले. ही संख्या शनिवारपेक्षा ३८० ने कमी आहे. रविवारी ४५७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ही संख्याही शनिवारपेक्षा किंचित कमी आहे. मात्र शनिवारपेक्षा मृत्यूसंख्येत काहीसे म्हणजे (१० ने अधिक) ७७ रुग्ण दगावले. रविवारचा कोरोना संसर्गाचा आलेख पाहता त्यात नवीन रुग्णसंख्येतील घट मोठी असून नवीन रुग्ण संख्येचा आलेख उतरता आहे. मृत्यूचे प्रमाण मात्र घटते नसून कधी घट तर कधी वाढ दिसून येत आहे.

नांदेड जिल्ह्यात जवळपास १५ दिवसांपासून रुग्णसंख्येत घट दिसत असून रविवारी अन्य सर्वच जिल्ह्यांत सलग दुसºया,तिसºया दिवशीही घट दिसून आली.एकुणच समाधानकारक चित्र असून नागरिकांनी अधिक काळजी तसेच आरोग्य प्रशासनानेही पुरेशी काळजी घेतल्यास लवकरच कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात घटलेला असेल.रविवारी लातूर जिल्ह्यात ९५७ नवे रुग्ण तर २९ मृत्यू झाले.

हिंगोली जिल्ह्यात शनिवारपेक्षा ४४ कमी म्हणजे १२१ नवे रुग्ण आढळले. तर शनिवारपेक्षा ४८ अधिक म्हणजे १९० रुग्ण कोरोनामुक्त झाले. ५ रुग्णांचा मृृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आलेख सलग २ दिवस उतरता दिसून येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारपेक्षा ८३ ने कमी म्हणजे ६२९ नवे रुग्ण आढळले. तर शनिवारपेक्षा ७३ अधिक म्हणजे ९१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मृत्यूसंख्येतही ३ ने घट होत ८ रुग्णांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातही सलग २ दिवस कोरोना संसर्गात घट दिसून आली.

परभणी जिल्ह्यात शनिवारपेक्षा २६० कमी म्हणजे ४३६ नवे रुग्ण आढळले. तर साधारण शनिवारएवढेच म्हणजे १०३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मृत्यूसंख्येतही कालपेक्षा २ ने घट होत १२ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या ४ दिवसांपासून कोरोना संसर्गात घट दिसून येत आहे. जालना जिल्ह्यात शनिवारपेक्षा १८ कमी म्हणजे ५६६ नवे रुग्ण आढळले. तसेच शनिवारपेक्षा १६३ कमी ६४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मृत्यूसंख्येत मात्र ७ ने वाढ होत रविवारी १६ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना संसर्गात सलग २ दिवस घट दिसून आली.

नांदेड जिल्ह्यात १५ दिवसांपासून सतत घट
नांदेड जिल्ह्यात शनिवारपेक्षा १६० कमी म्हणजे ३३७ नवीन रुग्ण आढळले. तर शनिवारपेक्षा ३३० ने कमी म्हणजे ७१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ३ दिवसांत मिळून १९ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सातत्याने पंधरा दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र अद्यापही साडेपाच हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत

आता लसीकरणावरही राजकारण?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या