27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमराठवाडाशाश्वत शेतीसाठी फळबाग लागवडीकडे वळावे-जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

शाश्वत शेतीसाठी फळबाग लागवडीकडे वळावे-जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

एकमत ऑनलाईन

लातूर : शाश्वत शेतीसाठी शेतक-यांनी फळबाग लागवडीकडे वळावे. तसेच संरक्षित शेतीसाठी शेततळे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले. तसेच जास्तीत जास्त शेतक-यांनी वृक्षलागवड करुन पर्यावरणाचे संरक्षण करावे. झाडे लावून संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

लातूर तालुक्यातील हरंगुळ (खु.) येथील उद्यानपंडीत पुरस्कारप्राप्त शेतकरी प्रकाश झुंजे यांच्या आंबा बागेस जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी भेट देऊन पाहणी केली. यानंतर जयश्री चंद्रकांत पाटील यांनी कृषि विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन अभियान योजनेतून घेतलेल्या सामुहीक शेततळ््याची पाहणी त्यांनी केली. तसेच सरपंच दादाराव पवार यांनी आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांनी वृक्षलागवड केली. या पाहणी दरम्यान ते बोलत होते.

आंबा बागेस दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी बागेतील वेगवेगळ््या वाणांच्या आंब्याच्या झाडांची एकत्र लागवडीची पाहणी करुन फळांची चव चाखली. याप्रसंगी प्रकाश झुंजे, कृषि सहायक सूर्यकांत लोखंडे, अ‍ॅड. महादेव झुंजे, मल्लखांब प्रशिक्षक मोहन झुंजे, सरपंच दादाराव पवार, उपसरपंच तथा इंदिरा सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन धनराज पाटील आदी उपस्थित होते.

यानंतर जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सामुहीक शेततळ््याची पाहणी केली. याप्रसंगी कृषि सहायक सूर्यकांत लोखंडे यांनी कृषि विभागामार्फत शेतकºयांनी राबविलेल्या योजनांची माहिती दिली.यानंतर पार पडलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सरपंच दादाराव पवार व उपसरपंच धनराज पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन गावातील विकासकामांबाबत चर्चा केली. याप्रसंगी ग्रामसेवक ए. सी. उस्तुरगे, दिगांबर पवार, सोमनाथ झुंजे, कपिल झुंजे, शिवमूर्ती झुंजे, आशा झुंजे, ग्यानदेव पवार, त्रिंबक पवार, अशोक भोळे, दिलीप कोरे, विजय झुंजे, विशाल झुंजे, अमीर शेख, बालाजी राठोड, विजय पवार, अभिजित सूर्यवंशी, अर्जुन राठोड, खमरु शेख उपस्थित होते.

Read More  भारत जगात पाचव्या स्थानावर!

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या