29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमराठवाडामराठवाड्यात दोन दिवस पावसाचे

मराठवाड्यात दोन दिवस पावसाचे

एकमत ऑनलाईन

मुंबई : मराठवाड्याला सलग दोन दिवस अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. गुरुवारी अनेक जिल्ह्यात तुरळक पाऊस पडला होता. तर शुक्रवारीही जालना जिल्ह्यात वादळी वा-यासह गारपीटीचा पाऊस पडला आहे. मुंबई हवामान खात्यानेही मराठवाड्यात गारपीटीसह वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील हवामान शास्त्र विभागानेही आगामी दोन दिवसांत मराठवाड्यात गारपीट, वादळीवा-यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

मराठवाड्यात २० आणि २१ मार्च रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी वादळी वा-यासोबत मेघगर्जना आणि पाऊस राहणार आहे. पुढील पाच दिवस या सर्व भागात पावसाचे वातावरण कायम राहणार असल्याचा इशाराही वेधशाळेने दिला आहे. एक-दोन ठिकाणी गारपिटीची शक्यता व्यक्त केली आहे.

सर्वच जिल्ह्यांना कमी – अधिक तडाखा
दरम्यान, मराठवाड्यात पुढील दोन दिवसांत वादळी वा-यासह विजांचा कडकडाट, गारपीट तसेच हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिली आहे. प्रामुख्याने बीड, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी या जिल्ह्यांना फटका बसणार असणार आहे. उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली जिल्ह्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर औरंगाबाद, जालना, परभणी, बीड जिल्ह्यांत वादळी वारा, विजांचा कडकडाट व पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जालन्यात वादळी वा-यासह गारांचा पाऊस
जालना जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. या दरम्यान शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता भोकरदन तालुक्यातील काही भागात अचानक वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाला. पंधरा दिवसांपूर्वीच तालुक्यातील विविध भागांमध्ये वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाला होता. त्यापाठोपाठ शुक्रवारी पुन्हा गारांचा पाऊस पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.भोकरदन तालुक्यातील निमगाव कुंभारी, हसनाबाद, तळेगाव, बोरगाव, खडकी, लतीफपूर, विटा, सावखेडा, कोपर्डा, बेलोरा, रजाळा, टाकळी, सोयगाव आदी ठिकाणी जोरदार गारांचा पाऊस पडला आहे. यामुळे काढणीस आलेल्या गहू, हरभरा, मका, करडई आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

गावात १० रुपयांना मिळणार एलईडी बल्ब

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या