22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeमराठवाडामराठवाड्यात अवकाळीचा दणका

मराठवाड्यात अवकाळीचा दणका

एकमत ऑनलाईन

लातूर : मराठवाड्यात रविवारी अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. वादळी पावसाने अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीज कोसळून जीवितहानी देखील झाली आहे. बीडमधील धारूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. आसोला येथील शेती खचून प्रचंड नुकसान झाले. तर जहागीर मोहा येथे शेतीची मशागत करण्यासाठी गेलेला ट्रेलर व जीप नदीच्या प्रवाहात वाहून गेले. फळबागांचेही नुकसान झाले. धारूर तालुक्यात अवकाळी पावसाने छोट्या नदी नाल्यांना पाणी आले आहे. धारूरच्या घाटामधल्या नदीचे पात्र भरून वाहले. परळी तालुक्यातील शिरसाळा परिसरामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले तर पहाडी पारगाव परिसरामध्ये सुद्धा जवळपास एक तास जोरदार पाऊस झाला.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. माहेर जवळा, चिंचोली, पिंपरी, आवलगाव या ठिकाणी वादळी वाºयासह पाऊस पडला. दुुपारी तीनच्या सुमारास अचानक पाऊस आला . एका तासात शेतात पाणीच पाणी झाले. पावसाने उन्हाळी पिकांसह आंबा, मोसंबी आणि इतर फळपिकांना मोठा फटका बसला.

नांदेडमध्ये महिलेचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यात शेतात काम करत असताना वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. इतर तीन महिला गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. मुदखेड तालुक्यातील मुगट येथे ही घटना घडली. अचानक सुरू झालेल्या पावसात वीज पडून लक्ष्मीबाई बालाजी वारचेवाड यांचा मृत्यू झाला. तर रेणुका मेटकर,अर्चना मेटकर,इंदूबाई लोखंडे या तीन शेतमजूर महिला गंभीर जखमी झाल्या.

परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या पोहचली हजारावर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या