29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमराठवाडानांदेड, परभणीत अवकाळी

नांदेड, परभणीत अवकाळी

एकमत ऑनलाईन

नांदेड/परभणी : मराठवाड्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुरुवारपासून अवकाळी पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरला असून, गुरुवारी सायंकाळी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. नांदेड शहर परिसरात तर रात्री साडेआठच्या सुमारास वादळी वा-यासह पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातही रात्री १२.३० च्या सुमारास रिमझिम सुरू झाला होता. त्यामुळे रबी पिकांसह द्राक्ष बाग, आंबा पिकांवरील धोका वाढला आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.

मराठवाड्यात गुरुवारी सायंकाळी अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. लातूरसह नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, बीडच्या काही भागात आकाशात ढग जमा झाले. त्यानंतर काही भागात पावसाने हजेरी लावली. नांदेड शहर परिसरात गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास ढग भरून आले. त्यानंतर १५ ते २० मिनिटे वादळी वा-यासह पाऊस झाला. तसेच अन्य भागातही पावसाने हजेरी लावली. तसेच परभणी शहर परिसरातही सर्वसाधारण पाऊस झाला. तसेच हिंगोली जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण होते. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातही वातावरण बदलले असून, पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुरुवारी सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. मात्र, दिवसभर आकाशात तुरळक ढग दिसून येत होते. मात्र, सायंकाळनंतर वातावरण बदलत गेले आणि अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सध्या रबी पिकांची काढणी सुरू आहे. त्यामुळे काढणीला आलेली रबी पिके आणि फळझाडांना धोका निर्माण झाला आहे.

मेळघाटातही झोडपले
गेल्या दोन दिवसांपासून मेळघाटात तयार झालेले ढगाळ वातावरण आणि आज आकाशात मेघ दाटून बरसलेल्या पावसामुळे बळीराजा पुन्हा आस्मानी संकटात सापडला आहे. गुरुवारी दुपारनंतर वादळी वा-यासह बरसलेल्या पावसातून कापणीसाठी तयार झालेल्या गहू, हरभ-यासह इतर पिकांची नासाडी झाली आहे. याबरोबर उन्हाळी पिके संकटात सापडली आहेत. आज गुरुवारी मेळघाटात पावसाच्या सरी कोसळल्या. तर काही ठिकाणी विजाही कोसळल्या. जंगल, अभयारण्यातून धो-धो पाऊस बरसला. धारणी आणि चिखलद-याच्या अतिदुर्गम भागात आदिवासी शेतक-यांकडून मोठी मशागत केल्यानंतर पठारावर पेरलेली पिके या वादळी पावसामुळे नेस्तनाबूत झाली आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलवसुलीच्या चौकशीचा आदेश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या