Homeमहाराष्ट्रमुंबई विमानतळावर भीषण आग

मुंबई विमानतळावर भीषण आग

अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात

मुंबई : मुंबई विमानतळावर आग लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. विलेपार्ले मुंबई विमानतळावरील टर्मिनल एक वर ही आग लागल्याची घटना घडली असून अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यास प्रशासनाला यश मिळाले आहे.

शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज असून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच विमानतळ पोलिस, महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते, बराच काळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते.आग लागल्यानंतर विमानतळावरील प्रवाशांचीही धांदल उडाली होती, तर काही प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये ही घटना कैद केल्याचे दिसून आले.

दरम्यान, अग्निशन दलाची बंब आल्यानंतर अग्निशमनच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीच्या घटनेने विमानतळ परिसरात धुराचे लोळ पसरले होते, तर प्रवाशांच्या लाँजमध्येही धुराचे लोळ आल्याने प्रवाशांनी तोंडावर हात ठेऊन, रुमालाचे झाकून बचाव केलाअखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले असून याचा विमानसेवेवर कुठलाही परिणाम झाला नाही. आपत्कालीन प्रतिसाद पथकांनी तासाभरात या आगीवर त्वरित नियंत्रण मिळवले असून विमानतळाचे कामकाज सुरळीत सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR