17.9 C
Latur
Friday, December 13, 2024
Homeमहाराष्ट्र‘मशाल’ला मत देण्याचे मौलानांचे आवाहन

‘मशाल’ला मत देण्याचे मौलानांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी
सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचारात उद्धव ठाकरे यांच्यावर ते हिंदुत्वाच्या विचारापासून लांब गेल्याचा आरोप होत आहे. महाविकास आघाडीच्या विजयासाठी मशिदीमधून फतवे निघत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्याचे एका मौलानांनी आवाहन केले आहे.

सध्या महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. या प्रचारामध्ये महाविकास आघाडीचा भाग असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर हिंदुत्वाच्या मुद्यावरून टीका होत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी बाळासाहेबांची हिंदुत्वाची विचारधारा सोडल्याचा आरोप होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाने हा मुद्दा लावून धरला आहे.

मुंबईतील दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुनील प्रभू यांना मतदान करण्याचे मौलानाने आवाहन केल्याचा व्हीडीओ समोर आला आहे. उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सुनील प्रभू आणि आमदार सचिन अहिर हे मौलानांसोबत बसलेले दिसले.

या व्हीडीओमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिंडोशीचे उमेदवार सुनील प्रभू आणि आमदार सचिन अहिरही दिसत आहेत. काल रात्रीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या उर्दू पत्रकावर आणि वर्सोवा विधानसभेत मुस्लिम उमेदवार उभा केल्यावरून ठाकरे गटावर टीका केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR