नवी दिल्ली : कॅप्टन सुमित सभरवाल यांचा शेवटचा मेसेज समोर आलाय. मेडे मेडे मेडे नो थ्रस्ट लूजिंग पॉवर अनएबल टू लिफ्ट असा सभरवाल यांचा शेवटचा मेसेज अळउ यांना होता. मेडे हा फ्रेंच शब्द आहे.
मेडे हा विमान धोक्यात असल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरला जाणारा सिग्नल आहे. जर एखाद्या विमानात गंभीर तांत्रिक बिघाड असेल किंवा ते अपघाताच्या स्थितीत असेल तर पायलट मेडे मेडे मेडे असा संदेश पाठवतो. नो थ्रस्ट म्हणजे विमानाला हवेत उंच उचलण्यासाठी पुरेशी शक्ती मिळत नसल्याचा सभरवाल यांचा शेवटचा मेसेज होता. लूजिंग पॉवर म्हणजे विमानाला हवेत उंच उचलण्यासाठी इंजिनमधून शक्ती मिळत नाही असा सभरवाल यांच्या मेसेजचा अर्थ होतो.
विमान जेव्हा कोसळले त्यावेळी त्याला थ्रस्ट म्हणजे विमान उचलण्यासाठी पुरेशी शक्ती मिळत नव्हती हे दृश्यांमधूनही दिसत आहे. विमानाला उचलण्यासाठी शक्ती का मिळत नव्हती याबद्दल जगभरातल्या जाणकारांनी वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. विमानाची दोन्ही इंजिन बंद झाली असतील किंवा इलेक्ट्रिकल पॉवर सप्लाय बंद झाला असेल असे जाणकार म्हणतात. दरम्यान सरकारने या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असल्याचे जाहीर केले आहे. या विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय चौकशी समिती गठित केली आहे.