Homeमनोरंजनस्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना अधिक संधी

स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना अधिक संधी

बॉलिवूड अभिनेत्रीचे मोठे वक्तव्य

मुंबई : नयनदीप रक्षित यांना दिलेल्या मुलाखतीत नुसरतने भरुचाने पुरुष कलाकारांच्या तुलनेत महिला कलाकारांना दुय्यम वागणूक दिली जाते, असे तिने म्हटले आहे. त्यादरम्यान, मुलाखतीमध्ये म्हणाली एखाद्या अभिनेत्याचा चित्रपट हिट झाला तर त्याला कामाच्या संधी उपलब्ध होतात. मग तो इनसाइडर असो किंवा आऊटसाइडर. पण, याउल महिला कलाकारांना कायम संघर्ष करावा लागतो.

मी ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटापासून हेच बोलते आहे. तुम्हाला फक्त संधी हवी असते. आपल्याकडे एखाद्या अभिनेत्यांना जितक्या संधी मिळतात त्या तुलनेत स्त्रियांना कमी संधी मिळते. याबद्दल सांगताना नुसरत म्हणाली एक वेळ अशी देखील होती जेव्हा मी विचारायचे की, फक्त पाच मिनिटांसाठी हिरोच्या व्हॅनिटीचा वापर करू शकते का? तो इथे नाहीये, मी वॉशरूम वापरू शकते का? पण, त्यावेळी मी तक्रारही केली नाही. मी स्वत:ला सांगायचे की मी इतकी मेहनत करेन की अशा गोष्टी मला सहज मिळतील. पुढे अभिनेत्री करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल म्हणाली, मी नेहमी इकोनॉमी क्लासमधून प्रवास करायचे. पण, आता बिझनेस क्लासमधून प्रवास करते. जर तिकिटचं मिळालं नाही तर गोष्ट वेगळी आहे.

मला आठवतंय एका चित्रपटामध्ये माझी भूमिका अगदीच छोटी होती. त्यावेळी सगळी स्टारकास्ट बिझनेस क्लासमध्ये बसली होती आणि मला इकोनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आले. त्यातील काहींनी मला त्यांच्यासोबत बस असे म्हटले होते. पण, मी नाही म्हणाले आणि तेव्हाच मनाशी ठरवले की मी प्रचंड मेहनत करेन आणि प्रोडक्शन हाऊस माझी बिझनेस क्लासमध्ये व्यवस्था करेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR