25.7 C
Latur
Saturday, June 14, 2025
Homeक्रीडामेस्सीला आठव्यांदा ‘फिफा’चा सर्वोत्कृष्ट पुरस्कार

मेस्सीला आठव्यांदा ‘फिफा’चा सर्वोत्कृष्ट पुरस्कार

नवी दिल्ली : अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेस्सीने गेल्या चार वर्षांत तिस-यांदा फिफाचा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार पटकावला आहे. त्याने नॉर्वेजियन स्ट्रायकर एर्लिंग हॅलँडला स्पर्धेत पिछाडीवर टाकले. महिलांमध्ये आयताना बोनमती हिने हा पुरस्कार पटकावला.
स्पेन आणि बार्सिलोनाची स्ट्रायकर ऐताना बोनामती हिला सर्वोत्कृष्ट फिफा महिला खेळाडूचा पुरस्कार मिळाला. मँचेस्टर सिटीचे प्रशिक्षक पेप गार्डिओला यांना २०२३ चा सर्वोत्कृष्ट पुरुष व्यवस्थापक पुरस्काराने गौरवण्यात आले. इंग्लंडच्या प्रशिक्षक सरिना विग्मन यांनी विक्रमी चौथ्यांदा वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षकाचा पुरस्कार जिंकला आहे.

गार्डिओला यांनी इंटर मिलानच्या सिमोन इंझाघी आणि नेपोलीच्या लुसियानो स्पॅलेट्टी यांचा पराभव करून हा बहुमान मिळवला. लंडन येथे झालेल्या समारंभात मँचेस्टर सिटीचा स्टॉपर एडरसनने सर्वोत्कृष्ट पुरुष गोलरक्षकाचा पुरस्कार पटकावला, तर मँचेस्टर युनायटेड आणि इंग्लंडच्या नंबर वन मेरी इर्प्सने सर्वोत्कृष्ट महिला गोलकीपरचा पुरस्कार पटकावला. कतार येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने स्पर्धा जिंकली होती.

यामुळे लिओनेल मेस्सीला २०२२ मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला होता. पॅरिस सेंट-जर्मेनसह लीग १ जेतेपद आणि मेजर लीग सॉकरमधील त्याच्या पहिल्याच हंगामात इंटर मियामीला आपल्या नेतृत्वाखाली लीग कप जिंकून दिल्यामुळे मेस्सी पुरस्काराच्या शर्यतीत होता.
मेस्सीने एर्लिंग हालांड आणि त्याचा माजी सहकारी किलियन एमबाप्पे यांना मागे टाकले. हालांडने मँचेस्टर सिटीसाठी सर्व स्पर्धांमध्ये ५२ गोल केले. याआधी मेस्सीने फिफा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कार २००९, २०१० २०११, २०१२, १०१५, २०१९,२०२२ जिंकला होता.

यंदा एकूण आठव्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. या पुरस्कारासाठी फिफा रेटिंग सिस्टीममध्ये मेस्सी आणि हालांडचे प्रत्येकी ४८ गुण होते. मात्र, राष्ट्रीय संघाच्या कर्णधारांना मिळालेल्या अधिक मतांमुळे मेस्सीने हा पुरस्कार पटकावला. राष्ट्रीय संघाचे कर्णधार, प्रशिक्षक, पत्रकार आणि चाहत्यांच्या मतांची मोजणी केल्यानंतर सर्वोत्कृष्ट पुरस्कार निश्चित केला जातो.
भारतीय कर्णधार सुनील छेत्री, हॅरी केन आणि मोहम्मद सलाह यांनीही मेस्सीला मत दिले. मेस्सीने स्वत: एम्बाप्पे आणि त्याचा सहकारी ज्युलियन अल्वारेझ यांच्यापुढे हालांडला मत दिले. फिफाच्या नियमांनुसार, अंतिम स्पर्धक गुणांवर बरोबरीत असल्यास त्यांच्या मतदारांच्या गटातून (या प्रकरणात कर्णधार) प्रथम पसंती असलेल्या व्यक्तीला विजेता घोषित केले जाते.

इटाना बोनामती सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू
बार्सिलोना स्टार इटाना बोनामती हिने क्लब आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट हंगामानंतर २०२३ साठी सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे. २५ वर्षीय मिडफिल्डर या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी पात्र होती. कारण, तिने २०२३ मध्ये स्पेनला पहिले जगज्जेतेपद आणि बार्सिलोनाला देशांतर्गत आणि युरोपीय विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR