डिस्रे हॉटस्टारच्या कार्यालयात घुसले मनसैनिक

मुंबई : प्रतिनिधी
मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. डिस्रे हॉटस्टारच्या अ‍ॅपवर क्रिकेट समालोचन मराठीत उपलब्ध नसल्याच्या मुद्द्यावरुन मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट कंपनीचं कार्यालय गाठलं आहे.
मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, संतोष धुरी यांनी वरळी येथील हॉटस्टारच्या कार्यालयात जाऊन निषेध नोंदवला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.

कंपनीचे वरिष्ठ अधिकारी भेट देत नसल्याने काही काळ वातावरण तापलं होतं. पण पोलीस फौजफाटा उपस्थित असल्यानं परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. अमेय खोपकर यांनी कंपनीच्या अधिका-यांना निवेदन देऊन लवकरात लवकर अ‍ॅपवर मराठीत समालोचन उपलब्ध करुन द्यावे असे ठणकावून सांगितले.

महाराष्ट्रात राहून इथे व्यवसाय करुन डिस्रे हॉटस्टारच्या अ‍ॅपवर क्रिकेटचं समालोचन हिंदी, गुजराती, मल्याळी, तेलुगु, भोजपुरी या सगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. पण मराठीत उपलब्ध नाही. हे अजिबात चालणार नाही. ही समज नाही तर धमकी समजा. पण मराठीत समालोचन तातडीने उपलब्ध झाले पाहिजे. नाहीतर डिस्रे हॉटस्टारच्या कार्यालयाच्या काचा खूप महाग आहेत हे लक्षात ठेवा , असा आक्रमक पवित्रा यावेळी अमेय खोपकर यांनी घेतला.

अधिकारी भेट देत नसल्याने राडा
मनसेचे पदाधिकारी हॉटस्टारच्या अधिका-यांना भेटण्यासाठी गेले असता बराच वेळ कुणी भेटायला तयार होत नसल्याने कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पदाधिका-यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. धमकीवजा इशारा दिल्यानंतर कंपनीच्या अधिका-यांनी कार्यकर्त्यांना भेट दिली. यात अमेय खोपकर यांनी निवेदन देत तातडीने मराठीत समालोचन उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|आदर्श संस्थेमधील घटनेवर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया
01:54
Video thumbnail
Nanded|लग्नाला नकार दिला अन् भररस्त्यात चाकू हल्ला! नांदेडमध्ये खळबळ
00:55
Video thumbnail
Latur|नाईस चायनीज सेंटरमध्ये तोडफोड; आरोपीला सोडल्याचा पोलिसांवर आरोप
03:21
Video thumbnail
Latur|SIR विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; निलंग्यात ८ ऑक्टोबरला महामोर्चाची घोषणा
05:13
Video thumbnail
Latur|अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या आरोपाने लातूर हादरलं; नागरिकांचा मोर्चा
17:27
Video thumbnail
Latur|मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक दुकान पेटलं; कोट्यवधींचं नुकसान!
03:11
Video thumbnail
Latur|विद्यार्थिनीची लैंगिक छळ प्रकरण!लातूरकर संतापले;आदर्श कॅम्पसवर दगडफेक
03:06
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
24:43
Video thumbnail
Latur|लातूरच्या गांधी मार्केट येथील इलेक्ट्रिक वास्तूच्या दुकानाला भीषण आग#Latur #fire
00:30
Video thumbnail
Latur|लातूर शहरात खुलेआम दादागिरी; चायनीज सेंटरमध्ये दुचाकी घुसवून नासधूस
00:39
Video thumbnail
Latur|लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ! विद्यार्थिनीचा विनयभंग;संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल
01:15
Video thumbnail
Latur|एकर सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त; केळगावच्या शेतकऱ्यांचा हृदय पिळवटून टाकणारा निर्णय
03:28
Video thumbnail
Latur|लातूर पोलिसांची दमदार कामगिरी; हरवलेले ५१ मोबाईल मूळ मालकांना परत
03:43
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथ गावात भीषण पाणीटंचाई; पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण
03:21
Video thumbnail
Nanded|नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीला गेलेले ३०५ मोबाईल मूळ मालकांना परत
02:20

Latest news