27.7 C
Latur
Friday, July 18, 2025
Homeमहाराष्ट्रसरळसेवा भरतीमध्येही आता किमान पर्सेंटाईल

सरळसेवा भरतीमध्येही आता किमान पर्सेंटाईल

राज्­य लोकसेवा आयोगाचा निर्णय प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द

मुंबई : शासकीय नोकरीतील काही पदे ही सरसेवा पद्धतीने भरली जात होती. यासाठी पुर्वी स्­पर्धापरीक्षेप्रमाणे नियम नव्हते पण आता स्पर्धा परीक्षेप्रमाणेच सरळसेवा भरतीप्रक्रियेकरीता किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने(एमपीएससी) घेतला आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

शासकीय नोकरीसाठी सरळसेवा भरती होत असेल तर आता उमेदवारांना निवड प्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी ठराविक पर्सेंटाईल गुण मिळवणे बंधनकारक राहणार आहे. हा निर्णय भरतीप्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गुणवत्ताप्रधान करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. यामुळे नियुक्­त करण्यात येणा-या पदासाठी योग्­य उमेदवाराची निवड होणार आहे. उमेदवाराच्या निवडीसाठी उच्च दर्जाचे निकष निश्चित होणार आहेत.

याबाबत २३ जून २०२५ रोजी टढरउ च्या संकेतस्थळावर अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी केवळ राज्­यसेवच्या स्­पर्धा परिक्षेत होणा-या भरतीसाठी पर्सेटाईंलचे गुण ग्रा धरले जात होते. या पद्धतीमुळे स्­पर्धा परिक्षेतून योग्­य उमेदवाराची नियुक्­ती होत होती. पर्सेंटाइल चा एक निकष म्हणून केला जातो, जिथे निवड होणा-या पदासाठी जास्त पर्सेंटाइल असलेले उमेदवार निवडले जातात.

का केला निर्णय लागू?
यापूर्वी सरळसेवा भरतीमध्ये लेखी परिक्षा व मुलाखत हे दोनच महत्­वाचे टप्पे होते. पण सध्या कोणत्­याही पदासाठी जाहीरात प्रसिद्ध झाल्­यास लाखोंने अर्ज येतात. पण आता पर्सेंटाईलच्या नियमामुळे निवडप्रक्रियेचे निकष अधिक कठीण होतील. त्­यामुळे चाळणीतून अधिक सक्षम उमेदवार निवडला जाईल. लेखी परिक्षेसाठी पर्सेंटाईल अर्हतामान प्रामुख्याने लेखी परिक्षेसाठी लागू होईल. परीक्षेच्या स्वरूपानुसार आणि प्रवर्गानुसार पर्सेंटाईलमध्ये बदल होणार आहे.

पर्सेंटाईल (शतमांश) अर्हतामान काय असते?
पर्सेंटाईल हे उमेदवाराच्या कामगिरीचे सापेक्ष मापन आहे, जे परिक्षेतील इतर उमेदवारांच्या तुलनेत किती चांगली कामगिरी केली हे दर्शवते. उदाहरणार्थ, ९० पर्सेंटाईल म्हणजे उमेदवाराने ९०% उमेदवारांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. एमपीएससीमध्ये, सरळसेवा भरतीसाठी उमेदवारांना ठराविक किमान पर्सेंटाईल गुण मिळवणे आवश्यक आहे ज्यामुळे केवळ उच्च गुणवत्तेचे उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR