बक-याच्या कुर्बानीवरून राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे पोलिसांना पत्र

पुणे : प्रतिनिधी
मीरारोडच्या घटनेचा संदर्भ देत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते, पोलिस आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्त यांना पत्र लिहिले आहे. ‘मीरा-भाईंदर परिसरात निवासी सोसाट्यांमध्ये सार्वजनिक स्वरूपात बकरे आणून धार्मिक कारणास्तव पशुबळी देण्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अशा प्रकारांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊन सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुण्यातही काही समाजविघातक, कट्टर प्रवृत्तीचे घटक सार्वजनिक ठिकाणी सोसायट्यांमध्ये किंवा रहिवासी भागांमध्ये अशाच प्रकारचे कार्यक्रम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता, आरोग्याचे निकष न पाळता सार्वजनिक ठिकाणी असे कार्यक्रम घेणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब आहे’ असे माधुरी मिसाळ यांनी पत्रात लिहिले आहे.

‘पुणे हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा जपणारे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे अशा प्रकारे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे’ असे माधुरी मिसाळ यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. पुण्यातील सार्वजनिक ठिकाणी आणि सोहळ्यांमध्ये अनुचित कृत्यांमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याबाबत पत्रातून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिलांशी गैरवर्तन
धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिलांशी गैरवर्तन व अश्लील वर्तनाच्या घटना वाढत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. महिलांशी छेडछाड, अश्लील कृत्ये आणि गैरप्रकार करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. पुणे पोलिस, महानगरपालिका आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30
Video thumbnail
नोएडामध्ये थरार! हायराईज सोसायटीच्या १२ व्या मजल्यावर भीषण आग; अनेक फ्लॅट्सना आगीचा विळखा
00:55
Video thumbnail
'पेड्डी' चित्रपटाच्या यशासाठी जान्हवी कपूर तिरुपतीच्या चरणी; ३,५५० पायऱ्या चढून पूर्ण केली नवसपूर्ती
00:58
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16

Latest news