पुढील वर्षभरात मोदी सरकार कोसळेल

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत मोठे राजकीय वक्तव्य केले. पुढील एका वर्षात पंतप्रधान मोदी यांचे सरकार कोसळले, असा दावा त्यांनी केल्याचे काँग्रेस सूत्रांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक परिस्थिती आणि देशात वाढत असलेला आर्थिक असंतोष हे यामागील प्रमुख कारण ठरतील, असे राहुल गांधी यांनी बैठकीत म्हटल्याची माहिती समोर आली आहे.

देशातील आर्थिक आव्हाने आणि जनतेतील वाढती नाराजी याचा परिणाम आगामी काळात हिंदुस्थानच्या राजकारणावर स्पष्टपणे दिसून येईल, असे राहुल गांधी यांनी बैठकीत नमूद केले. सध्याच्या परिस्थितीत जनतेत असंतोष वाढत असून त्याचे राजकीय परिणाम भविष्यात दिसतील, असा त्यांचा दावा होता.

‘अल्पसंख्याक’ शब्दाचा वापर
बैठकीदरम्यान काही नेत्यांनी ‘मुस्लिम’ या शब्दाऐवजी ‘अल्पसंख्याक’ हा शब्द वापरण्याची भूमिका मांडली. मात्र राहुल गांधी यांनी त्यास असहमती दर्शवली. अन्याय होत असलेल्या कोणत्याही समाजघटकाच्या बाजूने काँग्रेसने निर्भीडपणे उभे राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. तो हिंदू असो, दलित असो, सवर्ण असो, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन किंवा बौद्ध-जैन असो, काँग्रेसने सर्वांच्या अधिकारांसाठी आवाज उठवला पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.

इतर नेत्यांचा बोलण्यास नकार
याच बैठकीत काही नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे तक्रार मांडत अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर ते स्वत: स्पष्टपणे भूमिका घेत असले तरी पक्षातील इतर वरिष्ठ नेते अशा विषयांवर बोलण्यास टाळाटाळ करतात, असे सांगितले. राहुल गांधी यांच्याप्रमाणेच पक्षातील इतर नेत्यांनीही अल्पसंख्याकांच्या मुद्यांवर अधिक ठामपणे भूमिका मांडली पाहिजे, असा सल्ला या नेत्यांनी दिला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Shivraj motegavkar|मोटेगावकरची सोन्याची लंका; आदर्श कॉलनीत निर्माण होतंय शिश महल...
02:25
Video thumbnail
Latur|लातुरात मोकाट कुत्र्यांविरोधात गांधीगिरी आंदोलन;प्रभुराज प्रतिष्ठानचे अनोखे आंदोलन चर्चेत
02:15
Video thumbnail
Shivraj Motegavkar|NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा नवा व्हिडिओ व्हायरल..
01:43
Video thumbnail
नांदेड आगारातून चक्क एसटी बस चोरीचा प्रयत्न; चालकाचे प्रसंगावधान, आरोपी गेटवरच जेरबंद
01:22
Video thumbnail
व्हाईट हाऊसजवळ अंदाधुंद गोळीबार; सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात संशयित हल्लेखोर ठार, ट्रम्प सुरक्षित
01:46
Video thumbnail
निसर्गाची अद्भूत करणी! अवघ्या १२ फुटांवर लागलं पाणी
01:46
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला;गृहिणींचे बजेट कोलमडले
02:05
Video thumbnail
Nanded|नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; 14 लाखांचा घातक शस्त्रसाठा जप्त
02:39
Video thumbnail
Latur|NEET प्रकरणानंतर प्रशासनाचे डोळे उघडले;“क्लासेस, मेस, हॉस्टेल बंद करण्याचे आदेश
06:48
Video thumbnail
Latur|विश्वजीतची संघर्षगाथा; मृत्यूशी झुंज देत NEET ची तयारी,डोळ्यात अजूनही डॉक्टर होण्याचं स्वप्न
06:21
Video thumbnail
डिझेल टंचाईमुळे जिंतूर तालुक्यात शेतकरी हैराण; बोरी येथील पेट्रोल पंपावर मुक्काम ठोकण्याची वेळ
02:45
Video thumbnail
बिलोली उपजिल्हा रुग्णालयात संतापजनक प्रकार! गॅस संपल्याच्या बहाण्याने किचन बंद; रुग्ण उपाशी ?
04:25
Video thumbnail
राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा वाघ हल्ला; सिंदेवाही जंगलात ४ महिलांचा जागीच मृत्यू
00:30
Video thumbnail
५ जूननंतर नांदेड शहरात रस्त्यांची कामे होणार नाहीत; मान्सूनपूर्व बैठकीत मनपा आयुक्त यांचे संकेत
02:33
Video thumbnail
मध्यरात्री काळजाचा ठोका चुकला! माहूरच्या बाबा सोनापीर दर्गा परिसरात बिबट्याचे दर्शन
01:48

Latest news