ठाणे : मोदी सन २०१२ पासून शिवसेना फोडणार होते, मोदींचा ठाकरे यांच्या वरची खुन्नस २०१२ पासून आहे, २०१४ च्या आधीपासून पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी मोदींचे कारस्थान आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे माजी खासदार कुमार केतकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ सभेत त्यांनी हा हल्लाबोल केला आहे.
कुमार केतकर म्हणाले, मोदी-शहा महाराष्ट्र लुटून गुजरातला घेऊन जात आहेत. २००९ ला भाजपला इतक्या कमी जागा आल्या की अडवाणींना काढून टाकावे लागले. चार टप्पे मतदानाचे बाकी आहेत, मोदी काहीही करू शकतात. तुम्ही दिलेले मत भाजपला जाऊ शकते. ठाकरे यांच्या वरची खुन्नस २०१२ पासूनची आहे, मोदी २०१२ पासून शिवसेना फोडणार होते. पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी मोदींचे कारस्थान २०१४ च्या आधीपासून सुरु आहे. ही निवडणूक राजन विचारे आणि लोकशाही यांच्यात, नरेंद्र मोदी आणि फॅसिजम यांच्यात आहे, असे वक्तव्य कुमार केतकर यांनी केले आहे.