मोबाईल अ‍ॅपद्वारे रुग्णालय व्यवस्थेवर नजर!

मुंबई : प्रतिनिधी
शासकीय यंत्रणेने योग्य नियंत्रण ठेवल्यास आपोआप हॉस्पिटल्सना चांगले काम करावे लागेल. यासाठी मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करत आहोत. यामुळे पेशंट किंवा नातेवाईकांकडून ऑनलाईन आलेली तक्रार थेट आरोग्य विभागाला येईल. हॉस्पिटलची तक्रारदेखील ऑनलाइन पद्धतीने नातेवाईकाला देता येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

गेल्या ५ वर्षांत महात्मा फुले जनआरोग्य योजनेसंदर्भात आणि हॉस्पिटल संदर्भात १ हजार ७ तक्रारी आल्या होत्या, असे आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले. हॉस्पिटलमधील बेडची उपलब्धता मोबाईल अ‍ॅपद्वारे लोकांना मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासोबतच महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल आम्ही केले आहेत. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. पुढील एक महिन्यांमध्ये या योजनेतील आर्थिक मदतीमध्ये वाढ केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याने मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केली, या संदर्भात बोलताना आबिटकर यांनी लाडकी बहीण योजनेमुळे सर्वच खात्यांना निधीच्या बाबतीत कसरत करावी लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. बजेटमध्ये ज्या पद्धतीची निधीची उपलब्धता इतर विभागांना व्हायला हवी होती, ती झालेली नाही. यामुळे आमच्या सर्वांचीच थोडीशी अडचण झाली आहे. पहिल्या टप्प्यात काही धावपळ झाली, आता गाडी रुळावर येईल. लाडकी बहीणच नाही तर ज्या ज्या योजना दिल्या आहेत, त्यासाठीच्या निधीची उपलब्धता पुढच्या टप्प्यात होईल, असे प्रकाश आबिटकर यांनी म्हटले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात त्यांनी राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे जिल्ह्यातदेखील सर्वच निवडणुका एकत्रित लढवणे अपेक्षित आहे. सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येदेखील आम्ही एकमेकांच्या समन्वयाने लढलो तर राज्याचे चित्र दिसले ते जिल्ह्यात देखील दिसेल, असे ते म्हणाले.

जनआरोग्य योजनेअंतर्गत पैसे घेतल्यास कारवाई
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत एकही रुपया पेशंटकडून घ्यायचा नसताना दुर्दैवाने काही हॉस्पिटल पेशंटकडून पैसे घेत असल्याचे समोर आले आहे. त्या संदर्भात काही तक्रारी आल्या होत्या. अशा तक्रारींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापूरमध्ये ४ हॉस्पिटलवर अशी कारवाई झाली असून राज्यातदेखील ही कारवाई सुरू होईल, असे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
दिल्लीत जोरदार पाऊस आणि वादळ; ग्राउंड सपोर्ट उपकरणे आदळल्याने एअर इंडियाची ३ विमाने नुकसानग्रस्त
00:26
Video thumbnail
हातात माळ, कपाळावर टिळा; रणवीर सिंगने काशीमध्ये घेतलं महादेवाचं दर्शन!
00:30
Video thumbnail
Latur|अतिरिक्त फीस किंवा शैक्षणिक साहित्याची सक्ती केल्यास कारवाई. तृप्ती अंधारे ऍक्शन मोडवर.
03:22
Video thumbnail
Latur|ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
01:31
Video thumbnail
Latur Zp|ऑनलाईन प्रणाली बंद, तरीही लातूर जिल्हा परिषदेचे आर्थिक व्यवहार सुरू
01:55
Video thumbnail
Latur|आरटीओ अधिकाऱ्यांवर 35 हजारांची लाच मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.
03:19
Video thumbnail
Latur|राजीव नगरमध्ये तुंबलेल्या नाल्यांमुळे दुर्गंधीचं साम्राज्य;नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
02:50
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये खत-बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची गर्दी;खरीप तयारीला वेग...
02:21
Video thumbnail
धाराशिव: पवनचक्की प्रकल्पातील साहित्य चोरणारी टोळी गजाआड; १० गुन्हे उघड, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
01:12
Video thumbnail
परभणीत मान्सूनपूर्व वादळाचा धुमाकूळ;मांडाखळीत फळबागा उद्ध्वस्त, वीज खांब कोलमडले, झाड कोसळून बैल ठार
01:18
Video thumbnail
Latur|आमदार आणि आमदार पुत्राच्या त्रासाला कंटाळलेले दोन शेतकरी एकमत डिजिटल स्टुडिओमध्ये
11:51
Video thumbnail
अधिक महिन्यामुळे पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी; चंद्रभागा नदीपात्राला पार्किंगचे स्वरूप
02:00
Video thumbnail
लातूरमध्ये भाविकांच्या श्रद्धेला तडा; कोट्यवधींचा निधी पळवणारे किशोर महाराज शिवणीकरांवर गुन्हा दाखल!
06:19
Video thumbnail
Latur|अखेर किशोर महाराज शिवणीकर उर्फ ‘पिस्तुल्या महाराज’ यांच्यावर गुन्हा दाखल
04:45
Video thumbnail
उदगीर-जळकोट महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेनंतर CNG ऑटोचा स्फोट, रिक्षा जळून खाक, चालक बचावला
00:36

Latest news