29.9 C
Latur
Tuesday, February 10, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबई तोडणार नाही जोडणार

मुंबई तोडणार नाही जोडणार

मराठी-हिंदी भाषकांचे भाजपने मानले आभार

मुंबई : भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी मुंबई महापालिकेच्या निकालानंतर हिंदीभाषक आणि उत्तर भारतीयांचे आभार मानले. भाजप मुंबई तोडणार नाही, तर ती जोडणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर दहिसरमधील वॉर्ड क्रमांक तीनमधून विजयी झाले आहेत.

मराठी भाषक आणि उत्तर भारतीयांमध्ये तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न झाला. मात्र, मुंबईकर आणि मराठी माणसांनी त्यांना उत्तर दिले. इथे सारे गुण्यागोविंदाने नांदत आहेत, हे दाखवून दिले, असा टोलाही त्यांनी ठाकरे बंधूंना नाव न घेता हाणला.

प्रचंड आनंद देणारा विजय
भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, आज आम्हाला खूप आनंद आहे आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेले परिश्रम आणि देवाभाऊ आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर मुंबईकरांचा असणारा विश्वास हा या ठिकाणी दिसला. त्यामुळे हा विजय आम्हाला प्रचंड आनंद देणारा असा आहे.

तेढ निर्मितीचा प्रयत्न फसला
भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की हिंदीभाषी, उत्तर भारतीयांचा मनापासून आभारी आहे. खरे म्हणजे मराठी भाषक आणि उत्तर भारतीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता. परंतु मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी दाखवून दिले उत्तर भारतीय सुद्धा आमच्यासोबत इथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. उत्तर भारतीयांनी दाखवले या मातीने आम्हाला मोठें केले आहे. या मातीचा सन्मान केला पाहिजे म्हणून ते ही आमच्याबरोबर आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR