मुंबईचे वेळापत्रक जाहीर करणार

जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १४ वा दिवस असून सरकारने त्यांच्या १२ मागण्या मान्य केल्या असल्या तरी वंशावळ आणि कुणबी प्रमाणपत्रासाठी पुरावे दिल्याशिवाय प्रमाणपत्र निघणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, जरांगे पाटलांच्या मागण्यांची पूर्तता न झाल्याने ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत. तसेच, मुंबईकडे येणार असल्याचा इशारा त्यांनी यापूर्वीच दिला होता, तर १२ सप्टेंबरपर्यंतची देण्यात आलेली मुदतही संपुष्टात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांची पुढील भूमिका काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता, जरांगे पाटलांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन मराठा बांधवांना शनिवारी अंतरवालीत येण्याचे आवाहन केले आहे.

शनिवारी १२ सप्टेंबर रोजी १२ वाजता महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठा समाजाच्या लेकराबाळासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. शक्यतो प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित रहावे, कोणीही हायगाय करू नका. आता अटीतटीचा सामना आहे, घरी बसून टीव्हीवर बैठक पाहण्याचे दिवस नाहीत, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरातील मराठा बांधवांना अंतरवालीत येण्याचे आवाहन केले आहे. समाजाच्या लेकराची लढाई अंतिम टप्यात आलेली आहे, शक्यतो ज्याला ज्याला शक्य आहे त्याने उद्या बैठकीला हजर रहावे, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.

ज्यांना येणे शक्य नाही त्यांनी आशीर्वाद द्यायला रस्त्यावर आले तरी खूप झाले. मात्र, ज्यांना येणे शक्य नाही त्यांनीही आपल्या समाजासाठी लेकरासाठी एक दिवस समाजासाठी द्यावा. जो मार्ग जायचा ठरणार आहे, त्या ठिकाणी हातातली कामं टाकून रस्त्यावर येऊन आशीर्वाद देण्यासाठी या. उद्या मुंबईचा मार्ग टाकला जाईल, जिथे मुक्कामी असेल तिथल्या बांधवांनी जेवणाची मुक्कामाची व्यवस्था करावी, असे आवाहन जरांगे पाटलांनी केले आहे.

परवानगी नाही दिली तरी मुंबईला जाणार
मुद्दा पाऊस नाही, अडीअडचणी आहेत, त्यामुळे महिलांनी येऊ नका. गाव सांभाळले तरी खूप झाले, आरक्षणाचे आणि शेतीचे पण संकट आहे. सर्व गावक-यांनी वर्गणी करून गाड्या लावायच्या. एका तालुक्यात आपण लाखा पेक्षा कमी नाहीत, सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, असे म्हणत जरांगे पाटलांनी आता मुंबईला जाण्याचा निर्धार केला असून सरकारला थेट इशाराच दिला. ज्यादिवशी तारीख ठरेल त्या दिवशी काम सोडून रस्त्यावर या. मुंबईत आम्हाला त्रास झाला तर जागोजाग रस्ते अडवून ठेवा, सणावारचे दिवस आहेत, आपला जाण्याचे त्याच वेळेत ठरणार आहे. मागच्या वेळी परवानगी नाकारली, यावेळी ते नाकारणार नाहीत. परवानगी दिली आणि नाही दिली तरी मुंबईला जाणार असा इशाराच जरांगे पाटलांनी दिला. तसेच, न्याय देवता गोरगरिबांच्या लेकरावर अन्याय करत नाही, असेही त्यांनी म्हटले.

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|आदर्श संस्थेमधील घटनेवर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया
01:54
Video thumbnail
Nanded|लग्नाला नकार दिला अन् भररस्त्यात चाकू हल्ला! नांदेडमध्ये खळबळ
00:55
Video thumbnail
Latur|नाईस चायनीज सेंटरमध्ये तोडफोड; आरोपीला सोडल्याचा पोलिसांवर आरोप
03:21
Video thumbnail
Latur|SIR विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; निलंग्यात ८ ऑक्टोबरला महामोर्चाची घोषणा
05:13
Video thumbnail
Latur|अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या आरोपाने लातूर हादरलं; नागरिकांचा मोर्चा
17:27
Video thumbnail
Latur|मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक दुकान पेटलं; कोट्यवधींचं नुकसान!
03:11
Video thumbnail
Latur|विद्यार्थिनीची लैंगिक छळ प्रकरण!लातूरकर संतापले;आदर्श कॅम्पसवर दगडफेक
03:06
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
24:43
Video thumbnail
Latur|लातूरच्या गांधी मार्केट येथील इलेक्ट्रिक वास्तूच्या दुकानाला भीषण आग#Latur #fire
00:30
Video thumbnail
Latur|लातूर शहरात खुलेआम दादागिरी; चायनीज सेंटरमध्ये दुचाकी घुसवून नासधूस
00:39
Video thumbnail
Latur|लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ! विद्यार्थिनीचा विनयभंग;संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल
01:15
Video thumbnail
Latur|एकर सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त; केळगावच्या शेतकऱ्यांचा हृदय पिळवटून टाकणारा निर्णय
03:28
Video thumbnail
Latur|लातूर पोलिसांची दमदार कामगिरी; हरवलेले ५१ मोबाईल मूळ मालकांना परत
03:43
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथ गावात भीषण पाणीटंचाई; पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण
03:21
Video thumbnail
Nanded|नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीला गेलेले ३०५ मोबाईल मूळ मालकांना परत
02:20

Latest news