खालसा तील शेतकरी मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा; तिघांना अटक

नांदेड : प्रतिनिधी
शहरातील खालसा फायनान्सच्या कार्यालयात शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह आढळल्याच्या प्रकरणाला अखेर गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणी वजीराबाद पोलिस ठाण्यात रात्री उशिरा खून आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे, मात्र फायनान्सचा मुखीया फरार झाला आहे. दरम्यान फायनान्सच्या कार्यालयास पोलिसांनी कुलूप ठोकले आहे.

मृत शेतक-याचीं पत्नी ज्योती चंद्रकांत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास माळकौठा येथील मारोती मंदिराजवळून २ अनोळखी व्यक्तींनी शेतकरी चंद्रकांत शिंदे यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नांदेड येथील खालसा फायनान्स इंटरप्राईजेस या फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आणले. तेथे त्यांना २ दिवस डांबून ठेवून मारहाण करण्यात आल्याचे फियार्दीत नमूद आहे. त्यानंतर या कार्यालयात त्यांचा मृतदेह आढळून आला.या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विजराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), १४०(१), १४०(२), १४२, १२७(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखा व वजीराबाद पोलिसांनी संयुक्त कारवाई करून याप्रकरणी आरोपी जयकुमार ऊर्फ शेरा भगवान गायकवाड व्यवसाय खासगी नोकरी, रा. गोपाल चावडी, सिडको), शेख आमेर शेख साहेबहूसेन (व्यवसाय खासगी नोकरी, रा. मलंग बाबा बिल्डिंगजवळ, खुदबेनगर चौक, देगलूर नाका), इम्रान खान शाहबाज खान (व्यवसाय खासगी नोकरी, रा. बु-हाण मस्जिदजवळ, गोवर्धन घाट) या तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध अटकेची पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील इतर संबंधित व्यक्तींचा विशेष पथकांमार्फत शोध घेतला जात आहे. तर खुनाचा गुन्हा दाखल होताच फायनान्सच्या कार्यालयास पोलिसांनी कुलूप ठोकले आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत हे कुलूप कायम राहणार आहे.

कर्जाच्या वसुलीसाठी शेतक-याला कार्यालयात आणून डांबून ठेवने आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाची गंभीरता वाढली. घटनेनंतर जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही टीका करण्यात आली.या प्रकरणात सुरुवातीला गुन्हा दाखल करण्याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. मात्र, अखेर मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून वजीराबाद पोलिसांनी खून आणि अपहरणाच्या आरोपांखाली गुन्हा नोंदविला आहे. त्यामुळे शेतकरी मृत्यू प्रकरणाच्या तपासाला आता महत्त्व प्राप्त झाले आहे.अल्प रकमेच्या कजार्साठी खालसा या खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचा-यांनी शेतक-याला गावातून उचलून कार्यालयात आणून डांबून ठेवल्याचा आरोप समोर आल्याने खासगी कर्जवसुलीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये पित्यानेच सात वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप
03:41
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ!कमलाकर शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप |अरविंद पाटलांचे नाव चर्चेत
02:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पटवारी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन | खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे रुग्णसेवेचे आवाहन
01:53
Video thumbnail
Yedshi Fire Accident | Dharashiv News|येडशीत भीषण आग! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
02:01
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10

Latest news