मस्क-अंबानी समर्थक पुन्हा भिडले

मुंबई : एका बाजूला अंबानींचे समर्थक असा दावा करतात की, स्टारलिंक त्यांच्या कंपनीच्या स्वस्त इंटरनेट सेवांशी स्पर्धा करू शकत नाही. तर दुस-या बाजूला तेच लोक स्टारलिंकला एक मोठा स्पर्धक म्हणूनही रंगवतात. अंबानींच्या समर्थकांचे युक्तिवाद ढोंगी आणि हास्यास्पद आहे अशा शब्­दांमध्­ये अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांनी आज दि. (११ ऑक्­टोबर) पुन्हा एकदा रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्­यावर निशाणा साधला.

भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवण्यावरून मुकेश अंबानी यांची रिलायन्स आणि मस्क यांची स्टारलिंक कंपनी आमने-सामने आल्या आहेत. या संघर्षात आपली भूमिका अधिक आक्रमक करत मस्क यांनी पुन्हा एकदा आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून टीकास्त्र सोडले आहे. ७ ऑक्टोबर रोजी एक्स वरील एका युजरला उत्तर देताना मस्क यांनी म्हटले होते की दुर्दैवाने, भारतीय जनतेवर आपली मक्तेदारी कायम राखण्यासाठी काही अब्जाधीश उद्योगपती आम्हाला रोखत आहेत. ते कोण आहेत याचा तुम्ही अंदाज लावू शकता… हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा आहे.

अंबानींचा नफा कदाचित कमी होणार?
भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवण्यावरून मुकेश अंबानी यांची रिलायन्स आणि मस्क यांची स्टारलिंक कंपनी आमने-सामने आल्या आहेत. भारतात आपली सॅटेलाइट इंटरनेट सेवा स्टारलिंक सुरू करण्याच्या मुद्द्यावरून मस्­क यांनी आज केलेल्­या एक्­स पोस्­टमध्­येश म्­हटले की स्टारलिंकच्या आगमनामुळे भारतातील स्पर्धा वाढेल आणि सामान्य जनतेला इंटरनेट सेवेसाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. यामुळे अंबानींचा नफा कदाचित कमी होऊ शकेल, परंतु त्यांचा व्यवसाय बंद पडणार नाही. भारतातील स्टारलिंकच्या सेवा खूप महाग असतील, तर लोक त्या खरेदी करणार नाहीत; त्यामुळे कंपनीला आपल्या सेवांचे दर परवडण्याजोगे ठेवणे भाग पडेल.

ऑनलाइन समर्थकांचे हास्यास्पद युक्तिवाद
मस्क यांनी अंबानींच्या ऑनलाइन समर्थकांचे हास्यास्पद युक्तिवाद आहेत असे सांगताना म्­हटलं आहे की एका बाजूला ते दावा करतात की भारतातील अंबानींच्या जवळपास मक्तेदारी असलेल्या व्यवसायाच्या अत्यंत स्वस्त सेवांशी स्टारलिंक स्पर्धा करू शकत नाही. दुस-या बाजूला, तेच लोक दावा करतात की स्टारलिंक एक तगडा स्पर्धक ठरेल. हे निव्वळ ढोंगीपणा आणि अतिशयोक्तीपूर्ण विधान आहे.

वाढत्­या स्­पर्धेचा फायदा सर्वसामान्­य जनतेला
वाढत्या स्पर्धेमुळे भारतातील सामान्य जनतेलाच फायदा होईल कारण त्यांना निवडीसाठी अधिक पर्याय मिळतील. मस्क म्हणाले, “अंबानींचा नफा कदाचित कमी होईल, पण त्यांचा व्यवसाय बंद पडणार नाही. साहजिकच, जर भारतात स्टारलिंक खूप महाग असेल, तर कोणीही ती सेवा घेणार नाही; त्यामुळे स्पेसएक्सला दर परवडण्याजोगे ठेवावे लागतील.

मस्­क यांनी शेअर केले बातम्­यांचे स्क्रीनशॉट्स
भारतात स्टारलिंकची सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यास होत असलेल्या वारंवारच्या विलंबामुळे मुकेश अंबानी यांच्यावर मस्क सातत्याने टीका करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही पोस्ट केली. अंबानींची कंपनी भारतीय दूरसंचार बाजारपेठेतील एक प्रमुख कंपनींपैकी एक आहे. सॅटेलाइट कम्युनिकेशन सेवा सुरू करण्याच्या शर्यतीतही ती सहभागी आहे. भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावर आपली टीका सुरूच ठेवत, मस्क यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांमधील बातम्यांचे स्क्रीनशॉट्सही शेअर केले. या रिपोर्टमध्ये असा आरोप करण्यात आला होता की, रिलायन्स इंडस्ट्रीजकडून अर्थपुरवठा होणा-या एका कंपनीने सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) निवडणूक प्रचाराला चालना देण्यास मदत केली. रिलायन्सशी संबंधित एका संस्थेने सत्ताधारी पक्षाला मोठी राजकीय देणगी दिली.

रिलायन्सकडून सार्वजनिकरीत्या प्रतिक्रिया नाही
मस्क यांच्या आरोपांवर रिलायन्सने अद्याप सार्वजनिकरीत्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे, देशातील दूरसंचार आणि उपग्रह सेवांना मंजुरी देण्याची कार्यपद्धती न्याय्य आणि भेदभाव न करणारी आहे, तसेच कोणत्याही कंपनीशी भेदभाव केला जात असल्याचा आरोप निराधार आणि गैरसमजावर आधारित आहे अशी भूमिका सरकारने घेतली आहे. याआधी, एक्स वरील एका पोस्टमध्ये मस्क यांनी अंबानींवर टीका करताना त्यांना पंतप्रधान अंबानी असे संबोधले होते. त्यांच्यावर मक्तेदारी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. त्या पोस्टमध्ये मस्क यांनी अंबानींना विचारले की, ते भारतात स्टारलिंकला (स्पर्धा करण्याची परवानगी देण्याचा विचार करतील का असा सवालही त्­यांनी केला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded News | रोहित पवारांवर गुन्हा दाखल करा; भाजपाची पोलिसांकडे मागणी, महापौरांचे निवेदन
02:37
Video thumbnail
Latur News | समान काम समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; न्यायालयीन कामकाज ठप्प
05:22
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
LIVE - आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी शॉपच उद्घाटन
00:00
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42
Video thumbnail
Election Update|लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
04:13
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07

Latest news