नवी दिल्ली : आता तुम्ही घरबसल्या आधार कार्डमध्ये नोंदणी केलेला मोबाइल नंबर बदलू शकता. सरकारने आधार अॅपमध्ये ही सुविधा सुरू केली आहे. तसेच, पत्ता, नाव आणि ईमेल आयडी अपडेट करण्याची सुविधा लवकरच सुरू होईल. नवीन डिजिटल सेवेची घोषणा आधारचे नियमन करणा-या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेने केली आहे.
या बदलांसाठी वापरकर्त्यांना कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता भासणार नाही. अॅपवर ओटीपी पडताळणी आणि फेस ऑथेंटिकेशनद्वारे सर्व काही बदलता येईल. या सेवेमुळे दुर्गम भागातील लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि स्थलांतरितांना सोपे होईल.
आधार कार्ड ही देशातील सर्वात मोठी ओळख सेवा आहे, ज्यामध्ये १३० कोटींहून अधिक लोकांचा डेटा जोडलेला आहे. मोबाईल नंबर हा त्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, कारण याच नंबरवर डळढ द्वारे बँक खाते, सरकारी सबसिडी, आयकर पडताळणी आणि डिजीलॉकरसारख्या डिजिटल सेवांपर्यंत पोहोच मिळते. जर क्रमांक जुना झाला किंवा हरवला तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आतापर्यंत तो अपडेट करण्यासाठी नोंदणी केंद्रात जावे लागत होते, जिथे बायोमेट्रिक पडताळणी आणि लांब रांगांचा त्रास होता. पण आता यूआयडीएआय डिजिटल पद्धतीने हे सोपे करणार आहे.एक महिन्यापूर्वी यूआयडीएआयने आधार कार्डचे नवीन मोबाईल अॅप लॉन्च केले होते. यात वापरकर्ता एकाच फोनमध्ये ५ लोकांचे आधार ठेवू शकतो. यात आधारची फक्त तीच माहिती शेअर करण्याचा पर्याय आहे, जी आवश्यक असते. या अॅपमध्ये तुम्ही वढक मध्ये ज्या प्रकारे स्कॅन करून पेमेंट करता, त्याच प्रकारे आधार तपशील शेअर करू शकता. अॅपला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी यात फेस ऑथेंटिकेशनसारखी वैशिषटये जोडली गेली आहेत.
नवीन सेवा कशी काम करेल?
यूआयडीएआयनुसार, अॅपद्वारे आधारमधील अपडेट प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची किंवा प्रत्यक्ष भेटीची आवश्यकता नाही. संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होईल. जर तुम्ही अॅप डाउनलोड केले नसेल तर ते डाउनलोड करून सेटअप करावे लागेल.
– सर्वात आधी वापरकर्त्यांना आधार अॅप डाउनलोड करावे लागेल.
– येथे वापरकर्त्यांना आपला आधार क्रमांक टाकून लॉगिन करावे लागेल.
– नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, त्याचे व्हेरिफिकेशन करावे लागेल.
– पुढील वापरासाठी ६ अंकी लॉगिन पिन सेट करावा लागेल.
मोबाइल नंबर कसा अपडेट होईल?
– ६ अंकी पिन टाकून आधार अॅपमध्ये लॉगिन करा.
– खाली स्क्रोल करा, सेवांमध्ये माय आधार अपडेट वर क्लिक करा.
– सर्वात आधी मोबाइल नंबर अपडेट करण्याचा पर्याय दिसेल, क्लिक करा.
– येथे आवश्यक तपशील वाचा, कंटिन्यू वर क्लिक करा.
– सध्याचा मोबाइल नंबर टाका, ओटीपी व्हेरिफाय करा.
– नवीन मोबाइल नंबर टाका, ओटीपी व्हेरिफाय करा.
– फेस ऑथेंटिकेशन होईल, कॅमे-यात पाहून एकदा डोळे मिटा आणि उघडा.
– पेमेंट करण्याचा पर्याय दिसेल, रुपये ७५ जमा केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल.
– यूआयडीएआयने गेल्या महिन्यात आधार अॅप लॉन्च केले होते

