मुंबई : मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे समोर आले आहे. या निधनाच्या बातमीने फक्त सिनेमासृष्टीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी असल्याचे म्हंटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले की, ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दु:खी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. ‘क्रांतिवीर’ ते ‘नटसम्राट’ या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे.
परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे.’ असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुढे मुख्यमंत्र्यांनी नाना पाटेकर यांच्या सामाजिक कार्याबद्दलही भावना व्यक्त केल्या. ‘आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वत: नाना पुढे आले होते.
मकरंद अनासपुरेजी आणि त्यांनी सोबत येत ‘नाम फाऊंडेशन’ची स्थापना केली आणि स्वत: शिवारात जाऊन काम केले. शेतक-यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.’’ असे म्हणत त्यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली.
















