18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeनांदेडअतकूरमध्ये जमिनीच्या वादातून बापाने केला मुलाचा खून

अतकूरमध्ये जमिनीच्या वादातून बापाने केला मुलाचा खून

एकमत ऑनलाईन

धमार्बाद :प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या मौजे अतुकर येथे तआजीच्या नावे असलेली साडेतीन एकर जमीन हस्तगत करण्यासाठी सावत्रआई,सावत्रभाऊ आणि बापाने आपल्या मुलाचा हातपाय बांधून विहीरीत फेकून खून केला.हा धक्कादायक प्रकार तब्बल दोन महिन्यानंतर उघडकीस आल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अतकुर येथील रहिवासी बोंतीबाई लचमना दारमोड यांना दोन मुली होत्या. पहिली लक्ष्मीबाई हिचा विवाह चंद्रय्या याच्याशी झाला होता. चंद्रय्या यास घरजावई म्हणून आणले होते. लक्ष्मीबाई हीस मारोती हा एक मुलगा व दोन मुली होते. मारोती लहान असतांनाच लक्ष्मीबाई हिचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यामुळे चंद्रय्या याचा विवाह लक्ष्मीबाई हिची सख्खी लहान बहीण सावित्रीबाई हिच्याशी करण्यात आला होता. तीला अनिल हा मुलगा व एक मुलगी आहे. आजीच्या नावे असलेली साडेतीन एकर जमीन मारोतीच्या नावे होऊ नये या उद्देश्याने सावत्रआई सावित्राबाई वय ५० वर्षे, सावत्रभाऊ अनिल (२५ वर्षे) व वडील चंद्रय्या दारमोड ५५ वर्षे यांनी संगनमताने दस­-याच्या दिवशी मारोती याचे हातपाय दोरीने बांधून मारहाण केली.यानंतर शेताच्या शेजारी असलेल्या रमाकांत मोकले यांच्या विहीरीत टाकुन खुन केला. परंतु कोणासही याची शंका येवू नये म्हणून ते सर्व मारोतीचा शोध घेत असल्याचे गावक­यांना भासवत होते.

परंतु दि. ७ डिसेंबर रोजी विहीर मालक रमाकांत मोकले हे हरभ­-याला पाणी देत असतांना पाण्याची पातळी कमी झाल्याने पाण्यात काहीतरी असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर इतरांच्या माध्यमातून ओळख पटवली असता तो मारोती दारमोड असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांनी तात्काळ धमार्बाद पोलीस स्टेशनला माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय हिबारे, सहा. पो.नि. शिवप्रसाद कत्ते, पो. उपनिरीक्षक मारोती वाडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. गंगाधर दारमोड यांच्या तक्रारीवरुन सावित्राबाई दारमोड, अनिल दारमोड व चंद्रय्या दारमोड यांच्याविरुध्द धमार्बाद पोलीस ठाण्यात कलम ३०२, २०१ नूसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शिवप्रसाद कत्ते हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या