26.9 C
Latur
Sunday, May 29, 2022
Homeनांदेडअबब..क़ोरोनाने दिले नवे ८५७ रूग्ण

अबब..क़ोरोनाने दिले नवे ८५७ रूग्ण

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक २२ जानेवारी रोजी कोरोना बाधेने कोणाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ८५७ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९३.१३ झाली आहे.एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात ३७.९५ टक्के रुग्ण सापडले आहेत.

नांदेड मनपा विलगिकरणातून-५६६, सरकारी रुग्णालय विष्णुपुरी २, खाजगी रुग्णालय-०२, तालुक्यातील गृह विलगीकरण-४७,जिल्हा रुग्णालय कोवीड हॉस्पीटल २,अश्या ६१९ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९१ हजार १ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९३.१३ टक्के आहे. शनिवारी सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा ४८०, मुखेड १३, नांदेड ग्रामीण ६३, किनवट ८४, मुदखेड ०५, हदगाव ०५, बिलोली २२, अधार्पूर ०२,देगलूर-३१, लोहा-२१, माहूर ८,कंधार १९, नायगाव १६,भोकर ५, उमरी ६, धमार्बाद १२,हिमायतनगर १२, परभणी १९,हिंगोली ९, लातूर १०, जालना ३, औरंगाबाद २, अकोला १, पुसद २,उस्मानाबाद १, आदिलाबाद १, बीड १,निझामाबाद ३,बुलढाणा १, असे आहेत. शनिवारच्या २२५८ अहवालांमध्ये १२४९ निगेटिव्ह आणि ८५७ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९७७०९ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ७४९ आणि १०८ अँटीजेन तपासणीत असे एकूण ८५७ रुग्ण नवीन सापडले आहेत. स्वॅब तपासणी अहवाल निरंक असून नाकारण्यात आलेले स्वॅब १४५ आहेत.

आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ७ आहेत. कोरोनाचे ४०५० अ‍ॅक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण ३२४८, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण ७४३,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी २७, खाजगी रुग्णालयात २६, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड ३, हदगाव रुग्णालय १, बिलोली रुग्णालय २, असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ३ रुग्ण आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या