24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeनांदेडअर्धापुरात भाजयुमोची भव्य मोटारसायकल रॅली

अर्धापुरात भाजयुमोची भव्य मोटारसायकल रॅली

एकमत ऑनलाईन

अर्धापूर : देशातील केंद्र सरकारच्या सतेची आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अर्धापूर तालुक्यात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने बुधवार, दि. ८ जून रोजी भव्य विकास तीर्थ मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शहरातील वसमत फाटा चौकात भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करुन रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.

केंद्र सरकारने आठ वर्षात केलेल्या विविध विकास कामाचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडण्यासाठी भाजयुमोने विकास तिर्थ मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत शंभर ते दीडशे दुचाकी सहभागी झाल्या होत्या. रॅलीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी शहर दुमदुमले होते.

नरेंद्र मोदी चौक, टिपू सुलतान चौक, हनुमान मंदिर चौक, अहिल्याबाई होळकर चौक, बसस्थानक परिसर ते महात्मा बसवेश्वर चौक या मार्गाने जावून नंतर रॅलीचे विसर्जन करण्यात आले.

या रॅलीत भोकर विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे नेते धर्मराज देशमुख, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किशोर देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, शहराध्यक्ष विलास साबळे, जिल्हा सचिव डॉ. लक्ष्मण इंगोले, अशोकराव बुटले, माजी सभापती बाबुराव हेंद्रे, किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील कदम, माजी जि.प. सदस्य रामराव भालेराव, सरचिटणीस अवधुतराव पाटील कदम, नगरसेवक बाबुराव लंगडे, तुकाराम साखरे, शिवराज जाधव, कृष्णाजी इंगोले, भाजयुमो तालुकाध्यक्ष जेटन पाटील मुळे, शहराध्यक्ष तुकाराम माटे, हिरामन वाघमारे, उपसरपंच मनोहर खंदारे, प्रल्हाद कापसे, प्रभाकर बागल आदंसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या