18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeनांदेडआगामी निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार : खा.चिखलीकर

आगामी निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार : खा.चिखलीकर

एकमत ऑनलाईन

नांदेड:प्रतिनिधी
नांदेड-देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीतील पराभावाचे पुढा‍-यापासून ते पदाधिका‍-यांनी आत्मचिंतन करुन आगामी स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत सर्वांनी एकदिलाने काम केल्यास भाजपाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्‍वास नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.

नांदेड शहर व ग्रामीण भाजपा पदाधिका‍-यांच्या कार्यकारिणीची बैठक नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खा.चिखलीकर हे होते. या बैठकीस मराठवाडा विभागाचे संघटन मंत्री संजय कौडगे, आ.राम पाटील रातोळीकर, आ.तुषार राठोड, भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले, भाजपा नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर यांच्यासह शहर व ग्रामीणचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

खा.चिखलीकर म्हणाले, देगलूर-बिलोली विधानसभा पोट निवडणूकीत भाजपाचा पराभव झाला. या पराभवाचे आत्मचिंतन माज्यासह सर्वांनी करावे. निवडणूकीतील विजयाचे श्रेय एखाद्या व्यक्तीकडे जाते ही भावना मनात ठेवून काम केल्यास पक्षाचे नुकसान होते. त्याचा अनुभव देगलूरमध्ये आपल्याला आहे. एखाद्या व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे. त्यामुळे आपसातील मतभेदामुळे पक्ष छोटा करण्याचे पाप आपल्या हातून होवू नये याची काळजी प्रत्येक भाजपा खासदार, आमदार, पदाधिका‍-यांनी घेतल्यास आगामी स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत भाजपाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्‍वास चिखलीकरांनी व्यक्त केला.

स्थानीक स्वराज्य संस्थेतील माहूर, अधार्पूर, नायगांव नगर पंचायतच्या निवडणूका लागल्या आहेत. कांही दिवसानंतर नगर पालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणूका लागणार आहेत. भारतीय जनता पार्टी सर्व शक्तीनिशी नांदेड भाजपाच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. त्याचा अनुभव आपल्या सर्वांना देगलूरच्या पोटनिवडणूकीतून आला आहे. नगर पंचायत असो की नगर पालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत एखादा कार्यकर्ता निवडून येण्याची दाट शक्यता असतानाही त्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्या कार्यकत्यार्ला पक्षाच्यावतीने पाठबळ दिलं जाईल. केवळ पैसे नसल्यामुळे त्याची उमेदवारी कट करण्यात येणार नाही तर त्याला निवडून आणण्यासाठी सर्व ती मदत केली जाईल असे आश्‍वासन खा.चिखलीकर यांनी यावेळी दिले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना या तीन पक्षाच्या सरकारवर जनता प्रचंड नाराज आहे. वातावरण भाजपाच्या बाजूने असतानाही पक्षातील अंतर्गत गटबाजी व मतभेदामुळे आपल्याला पराभवाचे तोंड पाहावे लागत आहे. आपल्यातील वैयक्तीक हेवेदावे बाजूला सारून निवडणूकीत एकदिलाने काम केल्यास भाजपाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी आ.राम पाटील रातोळीकर, आ.तुषार राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कामाचा पंचनामा करुन निषेधाचा ठराव एकमताने मंजूर केला. शेतकरी विरोधी सरकारने कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन सक्तीने तोडण्याची मोहिम सुरु केली. त्या मोहिमेचा निषेध करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर निदर्शने करुन येत्या 8 डिसेंबर रोजी निवेदन देण्याचा सामुदायिक कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या