18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeनांदेडआजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार

आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार

एकमत ऑनलाईन

नांदेड: प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका पोटनिडणुकीसाठीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे.यानूसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रातील चौफाळा-मदिनानगर प्रभाग क्रमांक १३ अ साठी दि.२१ नोव्हेंबर रोजी एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी आज दि.२९ नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात सुरुवात होणार आहे.

महानगरपालिका पालिका क्षेत्रातील चौफाळा-मदिनानगर प्रभाग क्रमांक १३ साठी नुकताच राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार दि.२९ नोव्हेंबर २०२१ पासून ते ६ डिसेंबरपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. ७ डिसेंबर रोजी अजार्ची छाननी होणार आहे, ९ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार, १० डिसेंबर रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप तर २१ डिसेंबर रोजी मतदान तर २२ डिसेंबर रोजी २०२१ रोजी मतमोजणी पार पडणार आहे. होत असलेल्या पोट निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३-अ मधील ही रिक्त जागा अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव असून, राज्य निवडणूक आयोगाच्या १३ मार्च २०२० च्या आदेशानुसार तसेच महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ५-ब मधील तरतुदी नुसार राखीव जागेवरून निवडणूक लढवणा-्या उमेदवारांना नामनिर्देशनासोबत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे.

तसेच उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत शौचालय वापराबाबत प्रमाणपत्र, निवडणूक खर्चा करीता स्वतंत्र बँक खाते उघडणे बंधनकारक असणार, राखीव जागा असल्याने उमेदवारांना अनामत रक्कम दोन हजार पाचशे रुपये भरावी लागणार आहे. चौफाळा-मदिनानगर प्रभागात एकूण मतदार २१ हजार ४५३ एवढे असून त्यापैकी महिला मतदार १० हजार ४८७ तर पुरुष मतदारांची संख्या १० हजार ९६६ एवढी आहे.

दरम्यान महापालिकेच्या चौफाळा-मदिनानगर प्रभाग क्रमांक १३ अ साठी पार पडत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी केली असून, सदर पोटनिवडणूक चुरशीची ठरणार आहे.महापालिकेत कॉगे्रसची एकहात्ती असल्यामुळे या एका जागेसाठी अनेक इच्छुकांनी निवडणूकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून आपल्या नेत्याकडे लॉबिंग सुरू केले आहे,अशी ही चर्चा सुरू झाली आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या