29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeनांदेडआता भाजपला जशास तसे उत्तर मिळेल : सचिन सावंत

आता भाजपला जशास तसे उत्तर मिळेल : सचिन सावंत

एकमत ऑनलाईन

नांदेड:प्रतिनिधी
भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यास केलेल्या सुरूवातीला आम्ही जशास तसे उत्तर देवू असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंगे्रसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केले.
कॉंगे्रेस कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलेले कॉंगे्रस सरचिटणीस सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तत्पुर्वी नांदेड जिल्हा बँकेचा व महानगरपालिकेच्या विकास आराखडा माहित करून घेतला.यावेळी महापौर जयश्री पावडे, आ.अमरनाथ राजूरकर,आ.मोहनराव हंबर्डे, माजी मंत्री डी.पी.सावंत, सुभाष वानखेडे, सभापती किशोर सवामी,नगरसेवक मुन्तजिबोद्दीन आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना सचिन सावंत म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या लोकांमध्ये सत्याला सामोरे जाण्याचे नैतिक धैर्य नाही जे आमच्यात आहे. आम्ही आता भाजपाला जशास तसे उत्तर देण्याच्या तयारीत आहोत. कारण त्यांनी महाविकास आघाडी नेत्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचे काम सुरू केले आहे. मागील दोन वर्ष महाविकास आघाडी पाडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. नांदेडच्या देगलूर पोटनिवडणुकीतील कॉंगे्रसचा विजय हा पुर्नआगमनाचा बिगुल असल्याचे सावंत यांनी सांगितले. नांदेड हा राज्यातील सर्व कॉंगे्रस कार्यकर्त्यांसाठी उर्जा देणारा स्त्रोत आहे क़ेंद्र शासनाच्या वागणूकीने देशातील जनता त्रस्त झाली आहे. एसबीआय बँकेचे कर्ज वाटप जबाबदारी आता बँकेने अदानी यांना दिली आहे. हे किती दुदेर्वी असल्याचे सावंत म्हणाले.

रशियाचे प्रमुख ब्लादीमिर पुतीन यांच्या पॅर्टनवर मोदी चालत आहेत.ज्यानुसार कापोर्रेट जगताने विरोधकांना कांहीच आर्थिक मदत करू नये, सरकारचा जाहिरनामा त्यांनी आपल्या कामकाजात वापरावा असा तो पॅर्टन आहे. आरक्षणाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम भाजपने केले आहे. मुस्लीम आरक्षण, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षणासाठी आम्ही सकारात्मक असून त्या बाबत लवकरात लवकर काम करणार आहोत असे सावंत म्हणाले. एस.टी.विभाग जवळपास १२ हजार कोटीच्या नुकसानीत आहे. एसटी कर्मचा-यांच्या भावनाशी आम्ही सुध्दा सकारात्मक विचार करतो पण त्यांनी भाजपच्या नादी लागून आपले नुकसान करून घेवू नये असे सचिन सावंत यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या