18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeनांदेडआयुक्तांच्या निवासस्थाना बाहेरील जलकुंभ जमीनदोस्त

आयुक्तांच्या निवासस्थाना बाहेरील जलकुंभ जमीनदोस्त

एकमत ऑनलाईन

नांदेड: प्रतिनिधी
येथील स्नेहनगर भागातील महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेरील ३५ वर्ष जुने आणि जीर्ण जलकुंभ मंगळवारी जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. या कामासाठी स्नेहनगर ते आयटीआय चौक या मुख्य रस्त्यावरील एक बाजू बंद करण्यात आली होती.यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे पाहावयास मिळाले.

शहरातील अनेक ठिकाणी धोकादायक आणि जीर्ण जलकुंभ आहेत, त्या मनपा प्रशासनाकडून पाडण्यात येत आहेत. शहरातील स्नेहनगर भागातील मनपा आयुक्तांचे शासकीय निवासस्थान असलेल्या आवारातही सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत बांधण्यात आलेले ३५ वर्ष जुने जलकुंभ अनेक ठिकाणी लिकेज झाले होते. तसेच स्नेहनगर, सायन्स कॉलेज, पीपल्स कॉलेज हा परिसर भूकंप प्रवर्ण क्षेत्र असल्याने जलकुंभ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याची बनली होती.

त्यामुळे या जीर्ण जलकुंभास पाडण्याचा खेरीज मनपाकडे पर्याय नव्हता, त्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने हे जलकुंभ जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेत सोमवार दि.६ डिसेंबरच्या सायंकाळपासूनच सदर परिसरात बॅरिकेट लावून काबरा नगर, गणेशनगरकडे जाणारी वाहतूक पर्यार्यी रस्त्याने वळवण्यात आली होती. तर आयटीआय चौक ते स्नेहनगर पर्यंतच्या रस्त्यावर एकमार्गी वाहतुक सुरू ठेवण्यात आली होती. अखेर मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मोठ्या जेसीबी आणि मजुरांच्या साह्याने हे जलकुंभ जमीनदोस्त करण्यात आले. दरम्यान सदर भागात एकमार्गी वाहतूक सुरू असल्याने आयटीआय चौक ते स्नेहनगर पर्यंत काही काळ चांगलीच वाहतूक कोंडी झाल्याचे पहावयास
मिळाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या