34.3 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeनांदेड‘आरसीसी’च्या गुणवंत विद्यार्थ्यांना पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते कार भेट

‘आरसीसी’च्या गुणवंत विद्यार्थ्यांना पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते कार भेट

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिवर्षीप्रमाणे नीट -२०२१ मध्ये ही अद्वितीय कामगिरी करत प्रा. शिवराज मोटेगावकर संचालित ‘आरसीसी’ शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले आहे. यामध्ये तब्बल ६७१ विद्यार्थ्यांना ५५० पेक्षा जास्त गुण मिळवून दिले आहेत. संपूर्ण भारतात ७२० पैकी ७१० गुण घेऊन ३८ वा. आलेल्या अनिरुध्द डाखरे आणि ७२० पैकी ७०५ गुण घेऊन संपूर्ण भारतात ८७ वा. आलेल्या अथर्व वट्टमवार या आरसीसीच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या वचनाप्रमाणे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ुंदाई सेन्ट्रो कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की, आरसीसीचे गुणवंत विद्यार्थी आपल्या गुणवत्तेच्या बळावर नांदेडचे नाव देशभरात गाजवत आहेत. शिवाय गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर भेट दिल्यामुळे यापुढील विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारुन त्यांची गुणवत्ता बहरुन येईल, असे प्रतिपादन केले. या गौरव सोहळ्याप्रसंगी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, आरसीसी पॅटर्न लातूर – नांदेडचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर, आ. अमर राजुरकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, नांदेड दक्षिणचे आ. मोहणअण्णा हंबर्डे, नांदेड उत्तरचे आ. बालाजीराव कल्याणकर, म.न.पा. आयुक्त डॉ. सुनील लहाने, सीईओ वर्षा ठाकूर, विद्यमान महापौर जयश्रीताई पावडे, माजी महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर अब्दुल गफार, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, माजी सभापती मसुद अहेमद खॉन, अ‍ॅड. निलेश पावडे, शमीम अब्दुल्ला, भार्गव करिअर अकॅडमीचे संचालक भार्गव राजे, जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, माजी महापौर मोहिनी येवनकर महीला व बालकल्याण सभापती संगीता पाटील, महिला काँगेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. रेखाताई चव्हाण आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह संपूर्ण टीम उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी प्रा. मोटेगावकर आणि आरसीसीच्या यशाचे कौतुक करुन भरभरुन शुभेच्छा व्यक्त केल्या.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या