18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeनांदेडइच्छुकांची शेवटच्या दिवशी उमेदवारीसाठी गर्दी

इच्छुकांची शेवटच्या दिवशी उमेदवारीसाठी गर्दी

एकमत ऑनलाईन

नांदेड:प्रतिनिधी
नगरपंचायतसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी इच्छूकांनी उमेदवांनी गर्दी केली होती.मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ओबीसीच्या जागा वगळता इतर जागांसाठी होणा-या निवडणूकीसाठीनायगाव ८७,माहूर १४० तर अर्धापूरसाठी १५० अर्ज दाखल झाले आहेत.ओबीसी आरक्षणास स्थगिती मिळाल्याने इच्छूकांचा हिरमोड झाला आहे.

नायगाव: नगरपंचायतीच्या १७ ऐवजी १४ जागेसाठीच दि. २१ डिसेंबर रोजी मतदान होणार असून आज शेवटच्या दिवशी एकुण८७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. कॉग्रेस विरूध्द भाजपा मध्ये सामना रंगणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. नायगाव नगर पंचायत निवडणूकीचा सामना रंगतदार होणार असुन शेवटच्या दिवशी ७७ जणांनी यात कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना, भाजपा व अपक्षांचे असे मिळून शेवटच्या दिवस अखेर एकुन ८७ उमेदवारानी आपले अर्ज दाखल केले. ह्याावेळी कॉग्रेसचे मा.आ.वसंतराव चव्हाण, माजी महापौर अब्दुल सत्तार , विजय यवनकर , जि.प.सदस्य संजय अप्पा बेळगे , कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी पा भिलंवडे, हानंमतराव पा.चव्हाण ,श्रीनिवास पा .चव्हाण , नगरसेवक आनंदराव पा.चव्हाण , विजय पा.चव्हाण , सह आदीजण उपस्थित होते तर भाजपा कडून उमेदवारी अर्ज दाखल करतांना आ.राजेश पवार , जि.प.सदस्या पुनमताई पवार , लक्ष्मण ठक्करवाड, शिवराज पा .होटाळकर, बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील भिलवंडे यांची उपस्थिती होती.

माहूर: येथील नगर पंचायतीच्या निवडणुकीत १७ पैकी १३ वॉर्डातच निवडणूक होण्यावर सिक्कामोर्तब झाले आहे. माहूर नगर पंचायत निवडणुकीसाठी क्र.१, ३, ६ व ९ हे वॉर्ड नागरिकांच्या मागासवर्ग प्रवगार्साठी आरक्षित करण्यात आले होते. वॉर्ड ५ अनुसूचित जमाती महिला , वॉर्ड १६ अनुसूचित जाती खुला तसेच १७ वा वॉर्ड अनुसूचित जाती महिला साठी आरक्षित करण्यात आला आहे. त्याचसह २, ४, ७, ८, १०, ११, १२, १३, १४ व १५ हे वॉर्ड सर्वसाधारण पुरुष व महिलासाठी खुला केल्याने या ठिकाणी निवडणूक होणार असल्याची माहिती तहसीलदार तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी राकेश गिड्डे यांनी दिली. एकूण १७ ही वॉर्डा करिता विविध पक्ष व अपक्षाच्या वतीने १४० उमेदवारांनी अर्ज सादर केले. सर्व पक्षाच्या प्रभारीनी आपल्या उमेदवारांच्या अर्जा सोबत जोड पत्र एक व दोन जोडले आहे.

अर्धापूर : नगरपंचायत निवडणूकीसाठी दि. ७ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडून आल्याचे दिसून आले. तर आयत्यावेळी काँग्रेसने एम. आय. एम. चा विद्यमान नगरसेवक पळवून आपल्या पक्षाची उमेदवारी दिली. या बाबत काही वेळ एम. आय. एम. चे कार्यकर्ते संतप्त झाले होते. दरम्यान नाम निर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विविध पक्षाच्या उमेदवारांनी एकूण १५९ जणांनी उमेदवारी दाखल केली आहे.

नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी शेवटच्या दिवशी तहसील कार्यालय परिसरात चांगलीच रंगत पाहायला मिळाली. काल पर्यंत वीस जणांनी उमेदवारी दाखल केली होती. तर दि. ६ डिसेंबर रोजी एकूण २० जणांनी तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या विविध राजकीय पक्षांकडून १३० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. अशा प्रकारे आजपर्यंत एकूण १५९ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

शहरातील नगरपंचायत निवडणूकीत कॉग्रेस, भाजपा, एम. आय. एम, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. दि. ७ डिसेंबर रोजी कॉग्रेसकडून १७ , भाजपा. – १७, एम.आय.एम. – १३, शिवसेना – ६, राष्ट्रवादी काँग्रेस – ८ यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि अपक्ष असे एकूण १५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशी काँग्रेसचे पप्पू बेग, माजी नगराध्यक्ष नासेरखान पठाण, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, मुसबीर खतीब, डॉ. विशाल लंगडे, शेख लायक तर भाजपाच्या वतीने सौ. मिनाक्षी धर्मराज देशमुख, अँड. किशोर देशमुख, एम. आय. एम. कडून शेख शकील, मजहर उल्ला बेग, रियाना बेगम मुनीरभाई तांबोळी, शिवसेनेच्या वतीने सौ. पंचफुलाबाई मारोतराव येवले, शेख रफिक, काजी सलाउद्दिन, वंचित बहुजन आघाडी कडून आनंदराव सिनगारे आणि अपक्षासह एकूण १५० जणांनी उमेदवारी दाखल केली आहे.

यावेळी भाजपचे आमदार राम पाटील रातोळीकर, धर्मराज देशमुख, अ‍ॅड. किशोर देशमुख, तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, शहराध्यक्ष विलास साबळे, कॉग्रेसचे किशोर स्वामी, तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, शहराध्यक्ष राजू शेटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, जि. प. सदस्य बबनराव बारसे, उपजिल्हाप्रमुख दत्ता पाटील पांगरीकर, तालुकाप्रमुख संतोष कपाटे, शहरप्रमुख सचिन येवले तर एम. आय. एम. चे फिरोज लाला, तालुकाध्यक्ष शेख शकील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व उमेदवारांपैकी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दि. १३ डिसेंबर रोजी किती उमेदवार माघार घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.ू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या