नांदेड : प्रतिनिधी
ईपीएस-९५ च्या अल्प पेन्शन धारकाची मासिक बैठक दि.१८ रोजी बुधवारी सिडको येथील अंबादेवी मंदिर इंदिरा गांधी कॉलेज जवळ सकाळी आयोजित वीज केलेली आहे.
सदरील बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्ली येथीलसी. पी.एफ.ओ.ने काढलेल्या अन्यायकारक शाखा पत्रकाचा निषेध, सरकारला दिलेल्या आंदोलन नोटीसची मुदत संपल्यानंतर करावयाचे रास्ता रोको, रेल्वेरोको. आंदोलन इत्यादीवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
बैठकीला प्रांताध्यक्ष स.ना. आंबेकर, बी.आर. बनसोडे, सरदार बच्छिंदर सिंग, जी. एल्लया आदी नेते मार्गदर्शन करणार आहेत. या महत्त्वपूर्ण बैठकीस सर्व वस्त्रोद्योग, बिडी कामगार, महामंडळ, एसटी महामंडळ, साखर कारखाने आणि ईपीएस-९५ चे अल्प पेन्शन धारक इत्यादींनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ शिंदे, शेख नुरोद्दीन, काशिनाथ गरड, देविदास कदम, किशन मोरतळे, रामराव जावरे, दिगंबर भोळे, पंढरीनाथ रोडे, भुजंग स्वामी आदींनी केले केले.